फटाका स्टॉलच्या आगीत १६ दुकाने खाक
By admin | Published: November 10, 2015 02:37 AM2015-11-10T02:37:25+5:302015-11-10T02:37:25+5:30
मुखेड शहरातील जिल्हा परिषद शाळा (मुलांच्या) मैदानावर उभारण्यात आलेल्या फटाक्यांच्या दुकानांना सोमवारी सायंकाळी शॉर्टसर्किटने आग लागली
मुखेड (जि़नांदेड) : मुखेड शहरातील जिल्हा परिषद शाळा (मुलांच्या) मैदानावर उभारण्यात आलेल्या फटाक्यांच्या दुकानांना सोमवारी सायंकाळी शॉर्टसर्किटने आग लागली. यानंतर इतर दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत एकूण १६ दुकाने, तसेच ७ मोटारसायकलींसह एक आॅटोरिक्षाही खाक झाली.
मैदानाच्या शेजारी मुख्य रस्त्यावर बाजारपेठ असल्याने ही घटना कळताच एकच धांदल उडाली. अनेकांनी आपापली दुकाने बंद केली. फटाक्यांच्या आवाजाने परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले. आगीत मोठे नुकसान झाले़ मात्र, जीवितहानी झाली नाही.आग रात्री मुखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली.
अग्निशमन दलाची गाडी उशिराने घटनास्थळी दाखल झाल्याने संतप्त जमावाने गाडीवर दगडफेक करून काचा फोडल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांनी घटनास्थळास भेट दिली. (वार्ताहर)