१७ अर्ज बाद

By admin | Published: September 30, 2014 12:42 AM2014-09-30T00:42:17+5:302014-09-30T00:42:17+5:30

उमेदवारी अर्ज छाननीच्या प्रक्रियेत शहरातील सहा मतदारसंघातील एकूण १७ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले. यात काही अपक्ष आणि राजकीय पक्षांच्या ‘डमी’ उमेदवारांचा समावेश आहे. पूर्व नागपूरमधून एका उमेदवाराने

17 application afterwards | १७ अर्ज बाद

१७ अर्ज बाद

Next

एकाची माघार : प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध
नागपूर : उमेदवारी अर्ज छाननीच्या प्रक्रियेत शहरातील सहा मतदारसंघातील एकूण १७ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले. यात काही अपक्ष आणि राजकीय पक्षांच्या ‘डमी’ उमेदवारांचा समावेश आहे. पूर्व नागपूरमधून एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला.
विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची सोमवारी छाननी करण्यात आली. अर्जासोबत एबी फॉर्म न जोडणे, प्रतिज्ञापत्र अपूर्ण असणे आणि अर्जात देण्यात आलेली प्रस्ताविकांच्या नावाची संख्या कमी असणे किंवा ती मतदारसंघाच्या बाहेरची असणे, अर्ज चुकणे या कारणावरून सहा मतदारसंघातून एकूण १७ उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले. पूर्व नागपूरमधून कपिल आवारे यांनी माघार घेतली. १ आॅक्टोबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहतील, याचे चित्र स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)
अर्ज रद्द झालेले उमेदवार
दक्षिण - ईश्वर कडबे (बीएसपी डमी), क्षितिज राजपाल (रिपाइं), शारदा लांजेवार (अपक्ष),
दक्षिण-पश्चिम - जितेंद्र म्हैसकर (बीएसपी डमी),
पश्चिम- शेख मो. जमील मो. इब्राहिम (बीएसपी डमी), डॉ. दिलीप भगत (अपक्ष)
पूर्व - राजेश देशभ्रतार, अर्चना कळसाईत (बागडे), पुरुषोत्तम कृ. हजारे, पुरुषोत्तम हटवार
उत्तर - ज्योती जनबंधू (बीएसपी डमी), उमेश मेंढे (अपक्ष), जितेंद्र ससाणे (अपक्ष/सेना), अभिषेक शंभरकर, मोहनलाल चौहाण
मध्य - शरद वंजारी, दीपराज पार्डीकर

Web Title: 17 application afterwards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.