17 दिवस, 10 ट्रेनमध्ये फिरुन 'त्यांनी' शोधला भारत..

By admin | Published: February 16, 2017 02:36 PM2017-02-16T14:36:34+5:302017-02-16T15:16:16+5:30

भारत देश आणि त्यामधल वैविध्य सापडत ते प्रवासामध्ये. कुठलही नियोजन न करता केलेल्या टूरमध्ये तुम्हाला आपला देश, संस्कृती अधिक चांगल्या प्रकारे गवसते.

17 days, walking through 10 trains, 'He' discovered India .. | 17 दिवस, 10 ट्रेनमध्ये फिरुन 'त्यांनी' शोधला भारत..

17 दिवस, 10 ट्रेनमध्ये फिरुन 'त्यांनी' शोधला भारत..

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 16 - भारताला आणि भारतीयांना तुम्ही ठरवून कधीच शोधू शकत नाहीत. भारत देश आणि त्यामधल वैविध्य सापडत ते प्रवासामध्ये. कुठलही नियोजन न करता केलेल्या टूरमध्ये तुम्हाला आपला देश, संस्कृती अधिक चांगल्या प्रकारे गवसते. म्हणूनच समर्थ महाजन या तरुण दिग्दर्शकाने आपल्या दोन सहका-यांसह मागच्यावर्षी रेल्वेच्या अनारक्षित डब्ब्यांमधून प्रवास करुन भारताला शोधण्याचा प्रयत्न केला. 
 
समर्थसोबत सिनेछायाचित्रकार ओमकार दिवेकर आणि सहाय्यक दिग्दर्शक रजत भार्गव यांनी 17 दिवस 10 वेगवेगळया प्रवासी ट्रेनमधून अनारक्षित डब्ब्यांमधून प्रवास करुन लोकांशी संवाद साधला. 265 तासांच्या प्रवासात त्यांना जो अनुभव आला तो त्यांनी 'The Unreserved' या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून लोकांसमोर मांडला. 
 
मुंबई ते काश्मिर आणि आसाम ते कन्याकुमारी ही भारताची चार टोके त्यांनी पालथी घातली. या प्रवासात त्यांनी लोकांना बोलत केलं. लोकांनी गरीबीपासून, राजकारण, घरगुती हिंसाचार, व्यक्तीगत स्वप्न, आकांक्षा यावर मनमोकळेपणे आपली मत मांडली. ट्रेनमधून प्रवास करताना बाहेरचा भारत कसा दिसतो. त्याचे सुद्धा सुंदर चित्रण केले आहे. भारतातील निर्सगसौदर्य, रमणीयता पाहिल्यानंतर भारतात इतकी सुंदरता दडली असल्याचे लक्षात येते. त्यामुळे 'The Unreserved' मधून वेगळा भारत गवसतो. 

Web Title: 17 days, walking through 10 trains, 'He' discovered India ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.