विदर्भात 24 तासांत उष्माघाताचे 17 बळी!
By admin | Published: June 8, 2014 02:19 AM2014-06-08T02:19:42+5:302014-06-08T02:19:42+5:30
विदर्भात सलग दुस:या दिवशी उष्णतेची लाट कायम असून, शनिवारी विदर्भात नऊ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.
Next
>पारा रेकॉर्ड ब्रेक
नागपूर/चंद्रपूर : विदर्भात सलग दुस:या दिवशी उष्णतेची लाट कायम असून, शनिवारी विदर्भात नऊ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. यात नागपुरातील सहा, चंद्रपूरमधील दोन व अमरावतीच्या बडनेरा येथील एक जणाचा समावेश आहे. गेल्या 24 तासांतील उष्माघाताच्या बळींची संख्या 17 वर पोहोचली आहे. नागपुरात शुक्रवारी उष्माघाताने आठ जणांचा मृत्यू झाला होता.
शुक्रवारी मध्यरात्री 12.3क् वाजताच्या सुमारास रेल्वे स्थानकावर दोघांचे मृतदेह आढळले. यामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर 7क् वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. रेल्वेच्या डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर सकाळी 9 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर 55 वर्षाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. दोन्ही मृतांच्या शरीरावर कुठलीही इजा नसल्याने हे दोन्ही मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता रेल्वेने वर्तविली आहे.
त्याचबरोबर रेल्वे स्टेशन चौकात 7क् वर्षाच्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर कुठलीही इजा नसल्याने तो उष्माघाताने मरण पावल्याची शक्यता सीताबर्डी पोलिसांनी व्यक्त केली आहे. राणी दुर्गावती चौकात 75 वर्षीय वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू झाला.
रामभरोसे दीनदयाल गुप्ता असे मृताचे नाव आहे. पवनहंस श्री मेहरबाबा समाधी स्थळाजवळ एक 55 वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. उष्माघाताने तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट
केले आहे. (प्रतिनिधी)