१७ जागांची अधिसूचना; उमेदवारांचा पत्ताच नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 07:09 AM2019-03-20T07:09:31+5:302019-03-20T07:09:48+5:30
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील १७ मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली, तरी काँग्रेसचा एक अपवाद वगळता चारही प्रमुख पक्षांनी उमेदवारच जाहीर केलेले नाहीत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील १७ मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली, तरी काँग्रेसचा एक अपवाद वगळता चारही प्रमुख पक्षांनी उमेदवारच जाहीर केलेले नाहीत. उमेदवारीवरून असलेले पक्षांतर्गत वाद, प्रतिस्पर्धी उमेदवार कोण, यासाठी होत असलेली प्रतीक्षा आणि जातीय समीकरणे आदी कारणांमुळे भाजपासारख्या पक्षालादेखील उमेदवार जाहीर करता आलेले नाहीत.
नागपूर, रामटेक, वर्धा, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, यवतमाळ-वाशिम व चंद्रपूर या सात मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारी सुरुवात झाली. बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूरमध्ये मंगळवारी ही प्रक्रिया सुरू झाली. मात्र, लढतीतील काँग्रेस, राष्टÑवादी, भाजपा आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षांपैकी काँग्रेसने नागपुरातून नाना पटोले, गडचिरोली-चिमूर येथून नामदेव उसेंडी यांच्याशिवाय कोणाचीही उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही.
भाजपा-शिवसेना युतीमध्ये १७ पैकी १० जागा भाजपा, तर ७ जागा शिवसेना लढत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे तर नेमके जागावाटपही अद्याप जाहीर झालेले नाही. दोन टप्प्यांतील १७ पैकी १० जागा विदर्भातील आहेत. मुख्यमंत्री (पान १० वर)
१३ राज्यांत १८ एप्रिलला मतदान; दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशाच्या तेरा राज्यांमधील ९७ मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकांच्या दुसºया टप्प्यासाठी १८ एप्रिलला होणाºया मतदानासाठी मंगळवारी निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली. दुसºया टप्प्यात महाराष्ट्रातील १0 मतदारसंघांतही मतदान होणार आहे.
मतदान कधी?
पहिला टप्पा
11एप्रिल
दुसरा टप्पा
18 एप्रिल
पहिला टप्पा
नागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारी सुरुवात झाली.
दुसरा टप्पा : बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूरमध्ये मंगळवारी ही प्रक्रिया सुरू झाली. मात्र, लढतीतील काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षांपैकी नागपुरातून काँग्रेसचे नाना पटोले यांच्याशिवाय कोणाचीही उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही.
दुसºया टप्प्याचा
कार्यक्रम असा
उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारी सुरुवात झाली असून, २६ मार्च ही अंतिम मुदत आहे. उमेदवारी अर्जांची छाननी २७ मार्च रोजी होणार असून, अर्ज मागे घ्यायची मुदत २९ मार्च आहे. या ९७ मतदारसंघांमध्ये किती उमेदवार रिंगणात असतील, याचे चित्र २९ मार्च रोजी स्पष्ट होईल.
दुसºया टप्प्यात
कुठे निवडणुका
तामिळनाडू (३९ जागा), कर्नाटक (१४), महाराष्ट्र (१०), उत्तर प्रदेश (८), आसाम (५), ओडिशा (५), बिहार (५), छत्तीसगड (३), जम्मू-काश्मीर (२), मणिपूर (१), त्रिपुरा (१), पुडुचेरी (१), पश्चिम बंगाल (३) या तेरा राज्यांत मतदान होईल.