हायकोर्टात १७ टक्के महिला न्यायमूर्ती

By admin | Published: June 13, 2016 04:38 AM2016-06-13T04:38:53+5:302016-06-13T04:38:53+5:30

मुंबई उच्च न्यायालयात सध्या एकूण ६४ न्यायमूर्ती कार्यरत असून त्यात ११ महिला न्यायमूर्ती

17 percent female judges in the High Court | हायकोर्टात १७ टक्के महिला न्यायमूर्ती

हायकोर्टात १७ टक्के महिला न्यायमूर्ती

Next

राकेश घानोडे,

नागपूर- मुंबई उच्च न्यायालयात सध्या एकूण ६४ न्यायमूर्ती कार्यरत असून त्यात ११ महिला न्यायमूर्ती असून ही संख्या १७ टक्के आहे. या न्यायालयाला न्यायमूर्तींची ९४ पदे मंजूर आहेत.
महिला न्यायमूर्तींमध्ये विजया ताहिलरमानी, वासंती नाईक, रेखा सोनदुरबलदोता, मृदुला भटकर, साधना जाधव, रेवती मोहिते-डेरे, अनुजा प्रभुदेसाई, इंदिरा जैन, डॉ. शालिनी फणसाळकर-जोशी, स्वप्ना जोशी व नूतन सरदेसाई यांचा समावेश आहे. यापैकी इंदिरा जैन, डॉ. शालिनी फणसाळकर-जोशी, स्वप्ना जोशी व नूतन सरदेसाई या अतिरिक्त न्यायमूर्ती आहेत. विजया तहिलरमानी या, सर्व महिला न्यायमूर्तींना सेवाज्येष्ठ आहेत. तसेच, त्या एकूण न्यायमूर्तींमध्ये सेवाज्येष्ठतेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

Web Title: 17 percent female judges in the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.