मुंबईत १७ अतिसंवेदनशील केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2017 02:18 AM2017-02-19T02:18:46+5:302017-02-19T02:18:46+5:30

सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले असल्याने मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. २५ वर्षांची युती तुटल्यामुळे अनेक

17 susceptible centers in Mumbai | मुंबईत १७ अतिसंवेदनशील केंद्रे

मुंबईत १७ अतिसंवेदनशील केंद्रे

Next

मुंबई : सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले असल्याने मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. २५ वर्षांची युती तुटल्यामुळे अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आपसात भिडत आहेत. तर मनसे आणि शिवसेनेत प्रतिष्ठेची लढाई सुरु आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी या पक्षांचे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे महापालिका व पोलीस यंत्रणेने सर्वेक्षण करून मुंबईतील ६८८ मतदान केंद्र संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत. त्यापैकी १७ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. या ठिकाणी मतदानाच्या दिवशी तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने ३५ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त व वेबकास्ट कॅमेराची नजर असणार आहे. मुंबई महापालिका २०१७ साठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. महापालिकेच्या २२७ जागांसाठी २२७५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यासाठी २३ निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

ही आहेत अतिसंवेदनशील मतदान केंद्रे
- प्रभाग क्रमांक २२१ ,मध्ये दोन (सहावे) मतदान केंद्र- दी मुस्लिम कची खत्री जमतखाना, १६२ बापू खोटे मार्ग, मुंबई ४००००३
- प्रभाग क्रमांक २२१ मध्ये दोन (सातवे) काठियावाडी मन्सुरी जमातखाना ट्रस्ट, तळमजला, २२७, अली उमर स्ट्रीट, मुंबई ०३
- प्रभाग २२१ मध्ये दोन (आठवे) म्युनिसिपल उर्दू शाळा, अब्दुल कादिर हाफीझुल्ला मार्ग, मुंबई ०३
- प्र. क्र.२२४ (२२४/२१ ते २२४/२२) कामू जाफर सुलेमान शाळा, १७८ कांबेकर मार्ग, मुंबई ०३
- प्रभाग २२४ मध्ये तीन (२२४/२३ ते २२४/२५) कांबेकर मार्ग, महापालिका शाळा. कांबेकर मार्ग, मुंबई ०३
- प्रभाग २२४ मध्ये सहा (२२४/२६ ते २२४/३१) कटची मेमन जमतखाना, १३१, कांबेकर मार्ग, मुंबई ०३

Web Title: 17 susceptible centers in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.