परिस्थितीला कंटाळून १७ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 05:27 AM2017-10-05T05:27:24+5:302017-10-05T05:30:26+5:30
आर्थिक परिस्थितीला कंटाळून इयत्ता १२वीमध्ये शिकणा-या १७ वर्षीय विद्यार्थिनीने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी किनवट तालुक्यातील भीसी येथे घडली़
किनवट (जि़नांदेड) : आर्थिक परिस्थितीला कंटाळून इयत्ता १२वीमध्ये शिकणा-या १७ वर्षीय विद्यार्थिनीने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी किनवट तालुक्यातील भीसी येथे घडली़
पूजा विलास सिलगीर असे या विद्यार्थिनीचे नाव असून किनवटमधील आंबेडकरनगर गोकुंदा येथे ती आपल्या भाऊ आणि चुलत भावासह राहत होती. बुधवारी सकाळी १०च्या सुमारास तिने विषप्राशन केले़ यावेळी तेथे पूजाने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही आढळून आली़ तिच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असे कुटुंब आहे.
पूजाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये, ‘बाबा तुम्ही माझ्यासाठी एवढे कष्ट करता, मला माफ करा, आर्थिक अडचणीमुळे मी जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्या’चे म्हटले आहे़ ही चिठ्ठी पूजानेच लिहिली आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत.
पूजा सिरगिल हिची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत विदारक असल्याचे पुढे आले आहे़ तिच्या वडिलांकडे केवळ दीड एकर शेती आहे़ त्यामुळे उत्पन्नही तुटपुंजे मिळायचे़ शिक्षणासाठी ती किनवटला आली तेव्हा गावकºयांनी १००-२०० रुपये जमा करून तिला शिक्षणासाठी पाठविले होते, अशी माहिती सरपंच नंदू गायकवाड यांनी दिली़