१७१ पाणीपुरवठा योजनांचे एकाच वेळी इ-भूमिपूजन
By Admin | Published: July 11, 2017 05:23 AM2017-07-11T05:23:40+5:302017-07-11T05:23:40+5:30
पाणीपुरवठाविषयक विविध १७१ प्रकल्पांचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकाच वेळी मुंबई येथून ई-भूमिपूजन करण्यात आले
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याच्या विविध भागात मंजूर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजना, हवामान केंद्र, साठवण टाक्या, पाणी शुद्धीकरण संयंत्र, पाणी तपासणी प्रयोगशाळा अशा पाणीपुरवठाविषयक विविध १७१ प्रकल्पांचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकाच वेळी मुंबई येथून ई-भूमिपूजन करण्यात आले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वर्षा निवासस्थानातून फडणवीस यांनी रिमोटद्वारे या सर्व प्रकल्पांचे एकाच वेळी ई-भूमिपूजन करुन या कामांचा शुभारंभ केला.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ.राजेंद्र पाटणी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमात एकूण ११९ कोटी ७७ लाख रुपयांच्या १७१ पाणीप्रकल्पांचे ई-भूमिपूजन केले. त्यात, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या उंबर्डा बाजार, वनोजा, वारला, जऊळका, म्हसनी, चिंचांबाभर आदी पाणीपुरवठा योजनांचे यावेळी ई-भूमिपूजन करण्यात आले.