पास विक्रीतून 1.75 कोटी
By admin | Published: June 26, 2014 11:38 PM2014-06-26T23:38:28+5:302014-06-26T23:38:28+5:30
कल्याण स्थानकात 1 कोटीहून अधिक रकमेचे 6 हजारांहून अधिक पास विकले आहेत. हे पास त्रैमासिक, अर्धवार्षिक आणि वार्षिक स्वरुपाचे आहेत.
Next
>ठाणो : रेल्वेने मासिक पासच्या दरात केलेली वाढ लागू होण्याआधी पास काढण्यासाठी प्रवाशांनी केलेल्या प्रचंड गर्दीमुळे ठाणो स्थानकात 25 जून रोजी 7क् लाखांचे साडेपाच हजार पासेस तर कल्याण स्थानकात 1 कोटीहून अधिक रकमेचे 6 हजारांहून अधिक पास विकले आहेत. हे पास त्रैमासिक, अर्धवार्षिक आणि वार्षिक स्वरुपाचे आहेत.
9क् टक्के पास धारक साधारणत: मासिक पास काढतात. परंतु दरवाढीचा फटका बसू नये आणि शक्यतेवढी बचत व्हावी यासाठी पास धारकांनी त्रैमासिक, अर्ध वार्षिक आणि वार्षिक पास काढण्यावर भर दिला. अनेकांनी त्यांचा पास संपण्य़ास बराच कालावधी बाकी असतानाही केवळ दरवाढ टाळण्यासाठी काल पास काढण्यासाठी गर्दी केली होती. मध्य रेल्वेच्या इतिहासात ठाणो आणि कल्याण स्थानकांसाठी 25 जून हा दिवस विक्रमी ठरला. ठाण्यामध्ये 5 हजार 541 पासेस विकले गेले. त्याचे मूल्य 69,क्2,47क् एवढे होते. तर कल्याणमध्ये 6 हजारांहून अधिक विकल्या गेलेल्या पासेसचे मूल्य 1 कोटीहून अधिक होते. मध्यरात्री 1 वाजेर्पयत पास काढण्यासाठीची रांग कायम होती. ठाण्यामध्ये एकूण 24 तिकीट काऊंटर आहेत. ते सगळे 1 वाजेर्पयत प्रचंड रांगांनी भरलेले होते. गेल्या आठवडय़ात रेल्वेने घोषीत केलेली भाडेवाढ 25 जून पासून लागू होणार होती. तिच्यातून मुक्तता मिळविण्यासाठी पास धारकांनी हा जीवाचा आटापीटा केला. ठाणो स्थानकात रोज 2 हजार पासेसची सर्वसाधारणत: विक्री होते. परंतु या तारखेला ही विक्री अडीच पटीने अधिक होती. दर महिन्याच्या पहिल्या 1क् दिवसात ठाणो स्थानकात 25 हजार पासेसची विक्री होते. त्यातून 1क् ते 12 लाखांचे उत्पन्न मिळते. परंतु दरवाढीमुळे 25 जून हा दिवस विक्री आणि त्यातून मिळणारे उत्पन्न या दृष्टीने विक्रमी ठरला. अनेकांनी रांगेत खूप वेळ थांबावे लागेल हे लक्षात घेवून ऑफीसला दांडी मारली तर काहीनी रजाच घेतली होती. असाच प्रकार अन्य स्थानकांवरही झाला होता. परंतु त्यांची आकडेवारी मिळू शकली नाही.
याबाबत मानसी ओतुरकर यांनी सांगितले की, अंबरनाथला मी राहते. अंबरनाथ ते सीएटी हा वार्षिक पास पूर्वी मला 3,क्8क् रुपयांना मिळायचा दरवाढीमुळे तो 6 हजार रुपयांहून अधिक किमतीला मिळणार होता. त्यामुळे अनेक तास रांगेत उभे राहून जुन्या दराने पास मिळविणो, मी पसंत केले. (विशेष प्रतिनिधी)
च्कल्याण स्थानकात रोज 4क् हजार रुपयांच्या पासेसची विक्री होते. परंतु 25 जून रोजी झालेली 1 कोटीहून अधिक रुपयांच्या पासेसची झालेली विक्री अभूतपूर्व विक्रम होता. रेल्वे अधिका:यांनी सांगितले की, पासमधून रेल्वेला 6क् टक्के नफा होतो.
च्कल्याण स्थानकाने एका दिवसात 6क् लाखांचा नफा मिळवला. या स्थानकातून रोज 1 हजार पासेस विकले जातात. 25 जूनला 6 पट अधिक पासेस विकले गेले. असे काही घडेल याची कल्पना असल्याने स्थानकात रेल्वेने अशा स्थितीला सामोरे जाण्यासाठी तयारी केली होती.