साहित्यिकांच्या पाहुणचारासाठी १७५ डोंबिवलीकर
By admin | Published: January 19, 2017 05:23 AM2017-01-19T05:23:48+5:302017-01-19T05:23:48+5:30
साहित्य संमेलनासाठी देशभरातून हजारो साहित्यिक डोंबिवलीत दाखल होणार असल्याने त्यांच्या निवासाचे आव्हान आयोजकांपुढे आहे.
नागपूर : डोंबिवलीत होऊ घातलेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी देशभरातून हजारो साहित्यिक डोंबिवलीत दाखल होणार असल्याने त्यांच्या निवासाचे आव्हान आयोजकांपुढे आहे. हा भार काही प्रमाणात हलका करण्यासाठी डोंबिवलीकरांनी ‘साहित्यिक आपल्या घरी’ उपक्रमांतर्गत मान्यवर साहित्यिकांना घरी निवासाचे निमंत्रण दिले आहे.
संमेलनाची आयोजक संस्था असलेल्या आगरी युथ फोरमने ‘साहित्यिक आपल्या घरी’ उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. त्याला आतापर्यंत १७५ डोंबिवलीकरांनी प्रतिसाद दिला आहे. यजमानांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
।यू-ट्युबवरून थेट प्रक्षेपण
संमेलनात प्रत्यक्ष सहभागी होऊ न शकणाऱ्या साहित्यप्रेमींसाठी यू-ट्युबवरून संमेलनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
कोणता कार्यक्रम कधी आहे, याची माहितीही या लाइव्ह प्रक्षेपणादरम्यान देण्यात येणार असल्याने रसिकांना आवडीचे सत्र ठरवून बघता येणार आहे.