दिवाळीसाठी 17,550 बसेस

By Admin | Published: October 1, 2014 02:54 AM2014-10-01T02:54:02+5:302014-10-01T02:54:02+5:30

दिवाळसणानिमित्त कोकण रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला असतानाच आता एसटी महामंडळाकडूनही 17 हजार 550 ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

17,550 buses for Diwali | दिवाळीसाठी 17,550 बसेस

दिवाळीसाठी 17,550 बसेस

googlenewsNext

 एसटी महामंडळाचा निर्णय : 16 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर्पयत सेवा

 
मुंबई : दिवाळसणानिमित्त कोकण रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला असतानाच आता एसटी महामंडळाकडूनही 17 हजार 550 ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत. 16 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर्पयत या ज्यादा बस सोडण्यात येतील, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. मागील वर्षी 14 हजार 860 ज्यादा बस सोडण्यात आल्या होत्या. औरंगाबाद विभागातून 4,700, मुंबई विभागातून 3,250, अमरावती विभागातून 875, पुणो विभागातून 4,575, नागपूर विभागातून 775 आणि नाशिक विभागातून 3,375 बस सोडल्या जातील. दिवाळीपूर्वी पुण्याहून जाणा:या प्रवाशांची मोठी संख्या पाहता 19 ते 22 ऑक्टोबरदरम्यान पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर, स्वारगेट, मार्केट यार्ड, पिंपरी-चिंचवड येथून 1,985 अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.  (प्रतिनिधी)
 
औरंगाबाद 
विभागबसेस
औरंगाबाद1,225
बीड375
जालना175
लातूर800
नांदेड750
उस्मानाबाद1,100
परभणी275
 
मुंबई 
विभागबसेस
मुंबई575
पालघर675
रायगड375
रत्नागिरी400
सिंधुदुर्ग975
ठाणो50
 
नाशिक 
विभागबसेस
अहमदनगर1,100
धुळे750
नाशिक875
जळगाव650
 
नागपूर 
विभागबसेस
भंडारा175
चंद्रपूर150
नागपूर300
वर्धा150
 
पुणो 
विभागबसेस
कोल्हापूर325
पुणो1,100
सांगली1,275
सातारा850
सोलापूर1025

Web Title: 17,550 buses for Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.