धुळ्याजवळ तिहेरी अपघातात १८ ठार

By Admin | Published: June 25, 2016 04:13 AM2016-06-25T04:13:56+5:302016-06-25T04:13:56+5:30

नागपूर-सुरत महामार्गावर शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ट्रक, वडाप जीप व दुचाकीच्या भीषण तिहेरी अपघातात १८ जण ठार झाले, तर ५ जण जखमी झाले आहेत

18 killed in a triple crash near Dhule | धुळ्याजवळ तिहेरी अपघातात १८ ठार

धुळ्याजवळ तिहेरी अपघातात १८ ठार

googlenewsNext

धुळे : नागपूर-सुरत महामार्गावर शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ट्रक, वडाप जीप व दुचाकीच्या भीषण तिहेरी अपघातात १८ जण ठार झाले, तर ५ जण जखमी झाले आहेत.अपघातात जीपचा चक्काचूर झाला.
धुळ््यापासून १८ कि.मी. अंतरावरील भिरडाणे फाट्याजवळ हा अपघात झाला. मृत प्रवासी धुळ््याजवळच्या फागणे, मुकटी, अजंग आणि नवलनगर येथील रहिवासी आहेत. जखमींवर जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुकटी येथून प्रवासी घेऊन वडापची जीप धुळ््याकडे चालली होती. तर धुळ््याहून जळगावकडे चाललेल्या ट्रेलर ट्रकचे टायर फुटल्याने तो भिरडाणे फाट्याजवळ जीपवर आदळला. ट्रकच्या मागील बाजूचा दुचाकीलाही फटका बसला. ट्रकचालकासह दुचाकीस्वार जखमी झाले.
मृतांची नावे
मृतांमध्ये सुशील प्रेमराज खुराणा (वय ५५), रेखाबाई नरेंद्र सैंदाणे (वय ४५), चेतन नरेंद्र सैंदाणे (वय २०), रेखा भटू पाटील (वय ३५), विजय गुलाबराव पाटील (वय ४०, सर्व रा़ मुकटी ता़ धुळे), वसंत पंढरीनाथ पाटील, हेमलता मनोहर चौधरी, भारती हिरालाल बडगुजर (तिघे रा़ फागणे, ता़ धुळे), सीताबाई फुला अहिरे, रामलाल तुळशीराम तिवारी (दोघे रा़ अजंग, ता़ धुळे), सुलोचना राजेंद्र भदाणे (रा़ चोरवड, ता़ पारोळा), रफीक शेख इस्माईल (रा़ धुळे), सरिता विश्वनाथ पाटील (वय ४२, रा. नवलनगर), मंगलबाई भाऊसाहेब पाटील (वय ४५, रा. नवलनगर), योजना भटू पाटील (वय ४२, रा. फागणे), प्रताप पंडित ठाकरे (वय ४५, रा. नरव्हाळ, ता.धुळे), हिरकणबाई झिंगा पाटील (६०, रा. बाळापूर ता.धुळे), गोपीचंद पगारे (३५) अशी आहेत.
जखमींमध्ये प्रशांत नागराज पाटील (वय १६), नूतन संजय पाटील (वय ४०) व संजय निंबा पाटील (वय ४५, रा. चिंचखेडा, ता. धुळे), रतनसिंग गुरुबक्षसिंग रंधावा (वय ३२, ट्रकचालक, रा. मोहाडी) व एक अनोळखी इसम हे बेशुद्ध आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 18 killed in a triple crash near Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.