दोन अपघातांत १८ ठार
By admin | Published: May 26, 2015 02:30 AM2015-05-26T02:30:58+5:302015-05-26T02:30:58+5:30
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तलासरी येथे सोमवारी पहाटे दोन बसच्या अपघातात ११ जण ठार तर इतर १० जण गंभीर जखमी झाले.
तलासरी (जि. पालघर) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तलासरी येथे सोमवारी पहाटे दोन बसच्या अपघातात ११ जण ठार तर इतर १० जण गंभीर जखमी झाले. सुरत येथील पटेल कुटुंबीय गुजरातला परतत असताना टेम्पो ट्रॅव्हलर चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडला.
पटेल कुटुंबीय आपल्या नातेवाइकांना मुंबई एअरपोर्टवर सोडण्यासाठी आले होते. गुजरात येथे परत जात असताना महाराष्ट्राच्या हद्दीवरील आच्छाड येथे चालकाला डुलकी लागली. त्यामुळे त्याचा ताबा सुटून बस महामार्गावरील डिव्हायडर तोडून गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या लक्झरीवर आदळली. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हरलमधील १० तर लक्झरीमधील १ असे ११ जण जागीच ठार झाले. जखमींना वापी व सिल्व्हासा तसेच तलासरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातातील मृतांची नावे :
तुषार भरत पटेल (३२), अम्मी तुषार पटेल (३०), ध्येय तुषार पटेल (११), धवलभाई प्रवीणभाई पटेल (२८), भूमिका धवलभाई पटेल (२५), मनोहरभाई जेवेरभाई पटेल (४६), भूमी मणीशभाई महन्त (१८), डॅनिश प्रवीणभाई पटेल (३०), रिना डॅनिश पटेल (२७), जिया धवलभाई पटेल (५) आणि तुस्मानभाई व्होरा.
बारामती (जि. पुणे) : बालाजीच्या दर्शनाला निघालेल्या स्कार्पिओचा कर्नूर ते चित्तुर (आंध्र प्रदेश)दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. यात बारामतीच्या ७ युवकांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी पहाटे चालकाला डुलकी लागल्याने घडला.
च्बारामतीहून सात युवक स्कार्पिओ गाडीतून रविवारी तिरुपतीला देवदर्शनासाठी निघाले होते. सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास आंध्र प्रदेशातील कर्नूर-चित्तुर महामार्गावर चांगलामारीनजीक चालकाला झोप लागल्याने गाडी रस्त्यालगतच्या घरावर जाऊन आदळली. त्यात पाच जण ठार झाले तर अन्य दोघे जखमी झाले.
मृतांची नावे -
शेखर बापूराव गवळी (२२), हृषीकेश पोपट गवळी (१७), अनिल सत्यवान गवळी (२५), सागर बाळासाहेब रसाळ (२०), सागर अंकुश रसाळ (२५), अजित रामचंद्र रसाळ (३१), नागेश बाळासाहेब खराडे (२१).