विहिरीचा स्लॅब कोसळून १८ मजूर जखमी

By admin | Published: September 23, 2014 01:05 AM2014-09-23T01:05:08+5:302014-09-23T01:05:08+5:30

पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवर टाकण्यात येणारा स्लॅब कोसळून १८ मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना आर्णी तालुक्यातील तरोडा येथे सोमवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

18 laborers injured in wells slab collapses | विहिरीचा स्लॅब कोसळून १८ मजूर जखमी

विहिरीचा स्लॅब कोसळून १८ मजूर जखमी

Next

तरोडाची घटना : जलस्वराज्य अंतर्गत पाणीपुरवठ्याची विहीर
हिवरी/जवळा (यवतमाळ) : पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवर टाकण्यात येणारा स्लॅब कोसळून १८ मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना आर्णी तालुक्यातील तरोडा येथे सोमवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमींना यवतमाळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आर्णी तालुक्यातील जवळा येथे जलस्वराज्य योजनेंतर्गत अडाण नदीच्या तीरावर विहीर खोदण्यात आली. या विहिरीवर स्लॅब टाकण्याचे काम सोमवारी सुरू होते. मात्र ४.३० वाजताच्या सुमारास अचानक स्लॅब कोसळला. त्यासोबत स्लॅबवर असलेले मजूरही विहिरीत कोसळले. जखमींमध्ये कंत्राटदार सुनील उत्तमसा समदूरकर (४०), रवी ज्ञानेश्वर आत्राम (३६), भीमराव गाडेकर (५०), विष्णू जुगनाके (३५) सर्व रा.यवतमाळ, सुनील विठ्ठल मानकर (२७), चैतन्य अशोक वंजारी (२७) दोघेही रा.तरोडा, गजानन गोपाळ उईके (२३), गणेश वासुदेव इनवते (२८) दोघेही रा.मांगुळ यांच्यासह रघुनाथ राजाराम लोखंडे, संजय पांडुरंग मानकर, नरेश पंजाब मुनेश्वर, विशाल डोमाजी डांगे, गणेश महादेव आठवले, मंगेश भीमराव उईके, संजीव मानकर, राजीव आडे, विमलबाई तांबे, नभो गणेवार यांचा समावेश आहे. बहुतांश मजुरांच्या पायाला, छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन विहिरीत पडलेल्या मजुरांना बाहेर काढले आणि उपचारासाठी यवतमाळला रवाना केले.
या विहिरीचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. यावर स्लॅब टाकण्यासाठी चार महिन्यांपूर्वीच सेंट्रिंग करण्यात आले होते. त्यानंतर दोनदा अडाण नदीला पूरही आला. सोमवारी स्लॅब टाकताना कोणतीही खातरजमा न करता शाखा अभियंता आणि कंत्राटदाराच्या उपस्थितीत कामाला सुरुवात केली, अशी माहिती आहे. विशेष म्हणजे ४ वाजताच्या दरम्यान मजुरांनी आजचे काम पूर्ण झाले, असे म्हणत काम थांबविले होते. परंतु अभियंता व कंत्राटदाराने त्यांना पुन्हा काम करायला लावले. त्यामुळे स्लॅबचे वजन अधिक होऊन संपूर्ण स्लॅबच विहिरीत कोसळला. (वार्ताहर)

Web Title: 18 laborers injured in wells slab collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.