१८ महिन्यांची चिमुरडी ओळखते २६ देशांचे चलन, जगातील सात आश्चर्य
By admin | Published: September 21, 2016 11:26 AM2016-09-21T11:26:56+5:302016-09-21T11:52:34+5:30
लहान वयातच काही मुलांमध्ये असामान्य बुद्धीमत्तेची चुणूक दिसून येते. त्यांची हुशारी भल्या भल्यांना थक्क करुन सोडते.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २१ - लहान वयातच काही मुलांमध्ये असामान्य बुद्धीमत्तेची चुणूक दिसून येते. त्यांची हुशारी भल्या भल्यांना थक्क करुन सोडते. नागपूरमध्ये रहाणा-या अद्विका बाले या चिमुरडीनेही आपल्या ज्ञानाने अनेकांना थक्क करुन सोडले आहे.
अद्विका आता फक्त १८ महिन्यांची म्हणजे दीडवर्षांची आहे. मात्र इतक्या लहान वयातही अव्दिका २६ देशांचे चलन सहज ओळखते. जगातील सात आश्चर्य आणि त्या देशांची नावे ती सहज सांगू शकते. इतकचं नव्हे अव्दिका प्राण्यांची नाव इंग्रजीमधून मराठीत अनुवादीत करते.
मागच्या महिन्यांपासूनच अव्दिकाने बोलायला सुरुवात केली. तिची ही प्रगती पाहून आई-वडीलही थक्क झाले आहेत. अव्दिकाची आई आसावरी बाले यांनी ती सहा महिन्यांची असल्यापासून इंग्रजी अक्षर, फळे आणि प्राण्यांची चित्र दाखवण्यास सुरुवात केली.
अद्विका आठ महिन्यांची झाली तेव्हा तिच्या आईने जागतिक चलन, देशांची नावे तिला शिकवली. टाइम्स ऑफ इंडियाने अद्विका सोबत दोन तास घालवून तिला १०० प्रश्न विचारले. अद्विकाने तिला विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. फक्त दोन वेळा तिचा गोंधळ उडाला.