१८ महापालिकांमध्ये टीडीआर दुप्पट करणार

By admin | Published: January 29, 2016 02:06 AM2016-01-29T02:06:27+5:302016-01-29T02:06:27+5:30

राज्यातील १८ महापालिकांच्या हद्दीत शासन वा स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या भूसंपादनावर विकास हक्क हस्तांतरण म्हणजे टीडीआर दुप्पट करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

18 municipal corporations will double the TDR | १८ महापालिकांमध्ये टीडीआर दुप्पट करणार

१८ महापालिकांमध्ये टीडीआर दुप्पट करणार

Next

- यदु जोशी, मुंबई
राज्यातील १८ महापालिकांच्या हद्दीत शासन वा स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या भूसंपादनावर विकास हक्क हस्तांतरण म्हणजे टीडीआर दुप्पट करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
केंद्र सरकारच्या भू-संपादन कायद्याने संपादित जमिनीचा मोबदला सध्या बाजार दरापेक्षा दुप्पट मिळू लागला आहे. जमिनीचा दुप्पट दर आणि अन्य काही पॅकेज मिळू लागल्यानंतर टीडीआर घेण्याकडे कलच उरला नाही. त्यामुळे सरकारने आता टीडीआर दुप्पट करण्याचा निर्णय घेतला असून टीडीआरसह आकर्षक तरतुदी असलेल्या धोरणाची अधिसूचना नगरविकास विभागाचे अवर सचिव संजय सावजी यांनी गुरुवारी जारी केली.
नवीन धोरणानुसार दाट वस्तीच्या ठिकाणी संपादित जमिनीच्या तिप्पट तर विरळ वस्तीच्या ठिकाणी दुप्पट टीडीआर देण्यात येणार आहे. राज्य शासन वा स्थानिक स्वराज्य संस्था वा प्राधिकरणाला सार्वजनिक उपयोगाची इमारत जसे शाळा, आरोग्य केंद्र, वाचनालय आदी एखाद्याने बांधून दिले तर त्याला त्या मोबदल्यात टीडीआर देण्याची तरतूदही नवीन धोरणात करण्यात आली आहे.

टीडीआर म्हणजे काय?
खासगी मालकीची जमीन शासनाने संपादित केल्यानंतर त्याचा पैशांच्या स्वरुपात मोबदला न देता चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्यास त्याला विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) असे म्हणतात. मिळालेला एफएसआय तुम्हाला त्याच शहरात अन्यत्र वापरून जादाचे बांधकाम नियमानुसार करता येते. अतिरिक्त टीडीआर मिळाल्याने बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल. परिणामी, घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.

18महापालिकांमध्ये हे धोरण लागू करण्यात आले आहे.
नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली-मिरज-कुपवाड, चंद्रपूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, मालेगाव, औरंगाबाद, नांदेड-वाघाळा, लातूर, परभणी, अमरावती, अकोला

मुंबई, ठाण्यात लवकरच : मुंबई आणि ठाण्यासह त्या जिल्ह्णातील सर्व महापालिकांमध्ये टीडीआर धोरण याच धर्तीवर लवकरच लागू करण्यात येणार असल्याचे नगरविकास विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

भूखंडांचे स्वरुपअसा मिळेल टीडीआर (भूखंड क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये)
१००० चौ.मी.१००० ते४००० चौ.मी
पर्यंत४००० चौ.मी.व त्यापेक्षा अधिक
१)९ मीटरपेक्षा अधिक पण १२ मीटरपेक्षा कमी0.200.400.30
रुंदीच्या रस्त्यालगत असलेला भूखंड
२)१२ मीटरपेक्षा अधिक पण १८ मीटरपेक्षा कमी0.300.500.65
रुंदीच्या रस्त्यांलगत असलेला भूखंड
३)१८ मीटरपेक्षा अधिक पण २४ मीटरपेक्षा कमी 0.300.600.90
रुंदीच्या रस्त्यालगत असलेला भूखंड
४)२४ मीटरपेक्षा अधिक पण ३० मीटरपो कमी 0.300.801.15
रुंदीच्या रस्त्यालगत असलेला भूखंड
५)३० मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या0.301.001.40
रस्त्यालगत असलेला भूखंड

Web Title: 18 municipal corporations will double the TDR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.