सोलापूरात जि़प व पं़ स साठी १८ टक्के तर मनपासाठी १७ टक्के मतदान
By Admin | Published: February 21, 2017 12:50 PM2017-02-21T12:50:54+5:302017-02-21T12:50:54+5:30
सोलापूरात जि़प व पं़ स साठी १८ टक्के तर मनपासाठी १७ टक्के मतदान
सोलापूरात जि़प व पं़ स साठी १८ टक्के तर मनपासाठी १७ टक्के मतदान
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बुधवार २१ फेबु्रवारी रोजी सकाळी ७ ते सकाळी ११.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात जि़प व पं़ स १५.८९ टक्के तर मनपासाठी १७ टक्के मतदान झाले़ मतदानास सकाळी ७.३० वाजल्यापासून सुरूवात झाली़ सुरूवातीच्या कालावधीत मतदान केंद्रावर फारशी गर्दी दिसून येत नव्हती़ मात्र १० नंतर मतदान केंद्रावर लांबच्या लांब रांगा लागल्याचे पहावयास मिळाले़ सकाळच्या सत्रात रामलाल चौकातील मतदान केंद्रावरील मतदान यंत्र बंद पडले होते़ त्यामुळे काही वेळ मतदारांना रांगेतच उभे रहावे लागले़
जिल्ह्यातील मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सांगोला, अक्कलकोट, पंढरपूर, माळशिरस, मंगळेवढा, करमाळा, बार्शी आदी तालुक्यात मोठया उत्साहात मतदानास प्रारंभ झाला़ पानगांव (ता़ बार्शी) येथे मंदाकिनी ज्ञानदेव काळे या अपंग महिलेने प्रभाग १८३ बुथवर मतदानाचा हक्क बजाविला़ वडवळ (ता़ मोहोळ) येथे २१४० पैकी ४८९ (२३ टक्के) जणांनी मतदान केले़ ग्रामीण भागात पहिल्या दोन तासात फक्त ७ टक्के मतदान झाले होते़ दरम्यान, माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे मतदानासाठी पैसे वाटप करताना राष्ट्रवादीच्या १३ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले़ शिवाय केम (ता़ करमाळा) येथे मतदारांचया स्वागतासाठी केंद्राच्या प्रवेशव्दारावर सडा टाकून रांगोळी काढण्यात आली होती़
शहरात सकाळच्या सत्रात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख,माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्यासह राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते मंडळींनी आपल्या कुटुंबियांसमवेत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले़
----------------
सकाळी ७ ते ९़३० पर्यंत मतदान तालुकानिहाय
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी
करमाळा : ९़९५ टक्के
माढा : ७़४८ टक्के
बार्शी : ९़५९ टक्के
उत्तर सोलापूर : ८़२१ टक्के
मोहोळ : ९़०७ टक्के
पंढरपूर : ५़५७ टक्के
सांगोला : ६़१२ टक्के
मंगळवेढा : ५़५९ टक्के
दक्षिण सोलापूर : ७़८२ टक्के
अक्कलकोट : ८़०० टक्के
माळशिरस : ९़४७
एकूण : ७़९७