राज्यात अवघा 18 टक्के पाणीसाठा
By admin | Published: July 6, 2014 02:22 AM2014-07-06T02:22:29+5:302014-07-06T12:52:25+5:30
राज्यात सगळीकडे पावसाचे वातावरण दिसत असले तरी जलसाठय़ांची परिस्थिती चिंताजनक आहे. आतार्पयत सरासरीच्या केवळ 16 टक्के पाऊस झाला आहे.
Next
मुंबई : राज्यात सगळीकडे पावसाचे वातावरण दिसत असले तरी जलसाठय़ांची परिस्थिती चिंताजनक आहे. आतार्पयत सरासरीच्या केवळ 16 टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील जलसाठय़ांमध्ये केवळ 18 टक्के पाणी शिल्लक असल्यामुळे आठवडाभरात पाऊस झाला नाही, तर परिस्थिती आणखी गंभीर बनेल.
मोठय़ा सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठय़ाची आकडेवारी बघता सर्वात वाईट स्थिती पुणो महसूल विभागाची असून, तेथे 11 टक्के पाणी शिल्लक आहे. सर्वात चांगली परिस्थिती नागपूर विभागाची (44 टक्के) तर त्या खालोखाल अमरावती विभागाची (34 टक्के) आहे. इतर विभागांमध्ये मराठवाडा 18, कोकण 33, नाशिक 12 टक्के असा साठा आहे.
मध्यम प्रकल्पांमध्ये कोकण 22, मराठवाडा 14, नागपूर 19, अमरावती 33, नाशिक 2क्, पुणो 19 असा जलसाठा शिल्लक आहे. लघू प्रकल्पांमध्ये कोकण 26, मराठवाडा 9, नागपूर 17, अमरावती 18, नाशिक 9, पुणो 11 टक्के असा जलसाठा बाकी आहे. पावसाचे प्रमाण अत्यल्प असलेल्या नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, बुलडाणा, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड, कोल्हापूर, सातारा, पुणो, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे.
जुलैचा पहिला आठवडा संपत आला तरी समाधानकारक पाऊस पडत नसल्याने बळीराजा धास्तावला आहे. राज्यात अजूनही पाच-सात टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झालेली नाही. गेल्यावर्षी आजच्या तारखेर्पयत बहुतेक पेरणी आटोपली होती. लांबलेल्या पावसाने शेतक:यांची चिंता वाढविली आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली आहे. (विशेष प्रतिनिधी)
धरणांची पातळी वाढेना !
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणा:या तलावक्षेत्रत अद्याप समाधानकारक पाऊस पडत नसल्याने जलाशयांची पातळी वाढत नसल्याचे चित्र आहे. मान्सूनच्या आगमनानंतरही संपूर्ण जून महिना कोरडा गेला. जुलैच्या पूर्वार्धात मान्सून मुंबईत पुन्हा सक्रिय झाला. -वृत्त/2