१८ हजार महिलांनी केली मदत
By admin | Published: March 6, 2016 03:34 AM2016-03-06T03:34:49+5:302016-03-06T03:34:49+5:30
जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या मातृवंदन समारंभात मलबार हिल विभागातील १८ हजार महिलांनी १०-१० रुपये एकत्र करून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाकरिता मुख्यमंत्री
मुंबई : जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या मातृवंदन समारंभात मलबार हिल विभागातील १८ हजार महिलांनी १०-१० रुपये एकत्र करून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाकरिता मुख्यमंत्री मदत निधीमध्ये १ लाख ८० हजार रुपयांची मदत केली. भाजपा तसेच लोढाा फाउंडेशनद्वारे महिलांचा विकास आणि नवीन पिढीच्या संस्काराकरिता आयोजित तीन दिवसांच्या आयोजन उद्घाटनाच्या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना हे धनादेश देण्यात आले.
या वेळी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, आजच्या महिलांना त्यांच्या क्षमतेची जाणीव आहे. ती धीट होऊन आपली प्रतिभा, शक्ती आणि क्षमतेच्या बळावर सर्व मार्गावर यशस्वी होत आहे. समारंभाच्या अध्यक्षा मंजू लोढा या वेळी म्हणाल्या की, बदलत्या काळानुसार महिलांची सामाजिक जबाबदारीदेखील पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. मात्र त्या निर्विघ्नपणे पार पाडत आहेत. तीन दिवसांच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जवळपास १० हजारांपेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजक आ. लोढा या वेळी म्हणाले की, महिलाशक्तीच्या क्षमतेचे प्रदर्शन म्हणजे आजच्या पिढीला संस्कार मिळावेत, म्हणून या विशिष्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिवसाच्या पूर्वी आयोजित या कार्यक्रमात जवळपास २५ हजारांपेक्षा अधिक महिला सहभाग घेतील.