पशुवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या राज्यात १८0 जागा वाढल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2016 12:36 AM2016-08-13T00:36:56+5:302016-08-13T00:36:56+5:30

यावर्षी प्रवेशासाठी आले ६ हजार अर्ज; आता ४४४ जागा पदवी अभ्यासक्रमासाठी उपलब्ध.

180 seats in the state of Veterinary Degree course! | पशुवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या राज्यात १८0 जागा वाढल्या !

पशुवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या राज्यात १८0 जागा वाढल्या !

googlenewsNext

अकोला, दि. १२ : पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल बघता भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने यावर्षी राज्यातील पाच पशुवैद्यकीय महाविद्यालयांसाठी १८0 जागा वाढवून दिल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र पशू, मत्स्य विज्ञान विद्यापीठाने (माफसू) ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविल्याने यावर्षी सहा हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.
सर्वाधिक पाच पशू विज्ञान महाविद्यालये या राज्यात असून, पशुविज्ञानावरील संशोधनसाठी राज्यात महाराष्ट्र पशू, मत्स्य व विज्ञान विद्यापीठाची स्थापना झाली आहे. या विद्यापीठांतर्गत राज्यात मुंबई, शिरवळ पुणे, परभणी, उदगीर, नागपूर येथे पदवी महाविद्यालये आहेत. पशुविज्ञान या विषयासह या महाविद्यालयामधून मत्स्य विज्ञान व दुग्ध तंत्रज्ञान हे विषयदेखील शिकविले जातात. मागील वर्षीपर्यंत राज्यात २६४ पदवी अभ्यासक्रमासाठी जागा उपलब्ध होत्या. यावर्षी भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने १८0 जागा वाढवल्याने आता ४४४ जागा पदवी अभ्यासक्रमासाठी उपलब्ध झाल्या आहेत.
या अगोदर मुंबईला ८0 जागा होत्या येथे आता १00 विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार आहेत. म्हणजेच येथे २0 जागा वाढल्या आहेत. शिरवळला ३२ जागा होत्या, आता ६0 झाल्या आहेत. परभणीला ६0 होत्या. २0 जागा वाढल्याने ८0 विद्यार्थ्यांना येथे प्रवेश घेता येईल. उदगीरला ३२ जागेवरू न ६४ तर नागपूरच्या पशुविज्ञान महाविद्यालयाच्या २0 जागा वाढल्या आहेत. म्हणजे येथे ८0 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील.
दरम्यान, पशुविज्ञान, तंत्रज्ञान अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने यावर्षी सहा हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. मागील वर्षापर्यंत केवळ १५00 ते १८00 पर्यंंत अर्ज उपलब्ध होत होते; परंतु माफसूने प्रवेश ऑनलाइल केल्याने या जागेत वाढ झाली आहे.


राज्यातील पाच पशुवैद्यकीय महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी व्हीसीआयने यावर्षी १८0 जागा वाढवून दिल्या आहेत. भारतातील इतर राज्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक पशुवैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्याचा लाभ विद्यार्थी घेत आहेत. या सर्व महाविद्यालयांच्या बळकटीकरणासाठी शासनाने लक्ष केंद्रित केलेले आहे.
- डॉ. आदित्यकुमार मिश्रा,
कुलगुरू ,माफसू,नागपूर.

Web Title: 180 seats in the state of Veterinary Degree course!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.