चंद्रपूर केंद्रात १,८५० मेगावॅट वीजनिर्मिती
By admin | Published: October 11, 2015 03:55 AM2015-10-11T03:55:32+5:302015-10-11T03:55:32+5:30
चंद्रपूर महाऔष्णिक वीजनिर्मिती केंद्राची २ हजार १३० मेगावॅट क्षमता असून याच्या नजीक पोहोचत तब्बल १ हजार ८५० मेगावॅट इतकी विक्रमी वीजनिर्मिती सुरू आहे.
दुर्गापूर (चंद्रपूर) : चंद्रपूर महाऔष्णिक वीजनिर्मिती केंद्राची २ हजार १३० मेगावॅट क्षमता असून याच्या नजीक पोहोचत तब्बल १ हजार ८५० मेगावॅट इतकी विक्रमी वीजनिर्मिती सुरू आहे. केंद्रातील सहाही संच सुरळीत सुरू आहेत.
चंद्रपूर वीजनिर्मिती केंद्रातील एकूण सात संचांपैकी २१० मेगावॅटचे चार तर ५०० मेगावॅटचे तीन संच आहेत. पहिला संच २८ आॅगस्ट २०१४ पासून बंद आहे. उर्वरित सहा संचांतून प्रत्यक्ष विजेची निर्मिती सुरू असून यासाठी लागणारा कोळसा व पाणी येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. याशिवाय संच वारंवार बंद पडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. परिणामी येथील संच अधिकाधिक क्षमतेने वीजनिर्मिती करीत आहेत. मेपासून केवळ स्वदेशी कोळशावरच विजेची निर्मिती सुरू आहे. (वार्ताहर)
केंद्रातील २१० मेगावॅटच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या संचातून अनुक्रमे १३५, २०० आणि २०१ तर ५०० मेगावॅटच्या पाचव्या, सहाव्या व सातव्या संचातून अनुक्रमे ४२२, ४५३ व ४४१ अशी एकूण १ हजार ८५२ मेगावॅट विजेची निर्मिती सुरू आहे.