एसटीचा 1.89 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव?

By admin | Published: September 5, 2014 02:34 AM2014-09-05T02:34:25+5:302014-09-05T02:34:25+5:30

डिङोल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडत असून यामुळे आपोआप भाडेवाढ सूत्रनुसार भाडेवाढ केली जात आहे.

1.89 percent increase in ST rentals? | एसटीचा 1.89 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव?

एसटीचा 1.89 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव?

Next
मुंबई : डिङोल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडत असून यामुळे आपोआप भाडेवाढ सूत्रनुसार भाडेवाढ केली जात आहे. ऑगस्ट महिन्यात एसटी महामंडळाकडून नुकतीच भाडेवाढ केली गेली असतानाच आता पुन्हा एकदा महामंडळाकडून 1.89 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे समजते. 1 सप्टेंबरपासून देशभरात 50 पैशांनी डिङोल महागले असतानाच महाराष्ट्रात हेच डिङोल 63 पैशांनी महागले आहे. त्यामुळे महामंडळावर महिन्याला 26 कोटींचा बोजा पडणार आहे. हे पाहता महामंडळाकडून पुन्हा एकदा भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. भाडेवाढ केल्यास  दररोज 35 लाखाची उत्पन्नात भर पडेल. यानुसार प्रत्येक टप्प्याला साधारण 10 पैसे वाढ असेल, असे कळते.
 
कोकणातील चाकरमानी परतीच्या मार्गावर!
च्ठाणो : कोकणात गणोशोत्सवासाठी गेलेल्या मुलंड, भांडूप परिसरातील सुमारे  33 हजार 7क्4 चाकरमानी सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करून चाकरमानी आज परतीला निघाले . 
च्गावी सोडण्यासाठी ठाणो विभागाने 766 बस कोकणात सोडल्या आहेत. एका बसमध्ये सुमारे 44 प्रवाशांची आसन व्यवस्था केलेली आहे. यानुसार 33 हजार 7क्4 चाकरमानी कोकणात गेले आहेत. ते आता परतीला निघाले असून त्यांच्यासाठी  रायगड, र}ागिरी, सिंधुदुर्गमध्से बस तैनात केल्या आहेत.  या परतीच्या गणोशभक्तांना घेऊन या बस ठाणो  मुलुंड,  भांडूप, बोरिवली नॅन्सी, भाईंदर, कल्याण आणि विठ्ठलवाडीत येतील.  ठाणो विभागाच्या 191 बस तर नाशिक, नगर, धुळे,  औरंगाबाद या विभागांच्या सुमारे 55क् बस  आहेत.

 

Web Title: 1.89 percent increase in ST rentals?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.