विकासकामांसाठी १९ कोटी मंजूर
By admin | Published: July 13, 2017 01:43 AM2017-07-13T01:43:16+5:302017-07-13T01:43:16+5:30
विकास विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे १९ कोटी ३ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्याता देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे १९ कोटी ३ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्याता देण्यात आली.
स्थायी समिती सभागृहातील सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. २०१५-१६ मध्ये देय होणारी संचलनतूट समायोजन करण्याच्या अटीस अधीन राहून पीएमपीएमएलला उर्वरीत संचलनतुटीपोटी अदा करावयाच्या ५ कोटी ७२ लाख २१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात विद्यालयांची शैक्षणिक सहल आयोजित केलेनुसार सायन्स पार्क व पीएमपीएमएल यांना अदा करण्यासाठी येणाऱ्या सुमारे १६ लाख ५२ हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता दिली. उद्यान विभागाकडील वृक्षारोपणासाठी मोठी रोपे पुरविणे व लागवड करून १ वर्षे देखभाल करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ८१ लाख ५६ हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या उद्यानात व मैदानात ओपन जिमचे साहित्य खरेदी करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ११ लाख ७ हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
महापालिका दवाखाने व रुग्णालयांसाठी आवश्यक असणारे औषधे तसेच साहित्य खरेदी करण्यासाठी येणाऱ्या सुमारे १० कोटी रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. जिजामाता रुग्णालयाच्या इमारतीस उच्चदाब वीजपुरवठा करण्यासाठी येणाऱ्या ४६ लाख १० हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
>संत तुकारामनगर प्रेक्षागृहातील वायुशितक वातानुकूल यंत्रणेचे नूतनीकरण करण्यासाठी येणाऱ्या सुमारे १ कोटी १२ लाख ४८ हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. सांगवी तसेच दापोडी मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्र. ६० येथे इनलेट चेंबर ते सांगवी व दापोडी पंप हाऊसपर्यंत मलनिस्सारण नलिका टाकण्यासाठी येणाऱ्या सुमारे ३६ लाख ४१ हजार रुपये, महानगरपालिकेच्या सर्व विभागाचे संगणकीकरण करण्यात आले असून सर्व्हेरची क्षमता वाढविण्याकामी ६ नग खरेदी व त्याचे एक वर्ष देखभाल दुरुस्ती करण्यासाठी येणाऱ्या सुमारे १८ लाख २१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.