ठाण्यात आचारसंहिता पथकाने पकडली 19 लाखांची रोकड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 10:45 PM2019-04-17T22:45:15+5:302019-04-17T22:46:00+5:30
ठाणे लोकसभा मतदारसंघामधील ठाणो विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रतील कोलशेत, सँडोज बाग भागातील एका कारमधून गस्तीवरील आचारसंहिता पथकाने 19 लाखांची रोकड जप्त केली
ठाणे - ठाणे लोकसभा मतदारसंघामधील ठाणो विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रतील कोलशेत, सँडोज बाग भागातील एका कारमधून गस्तीवरील आचारसंहिता पथकाने 19 लाखांची रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याच्या सूचना कापूरबावडी पोलिसांना या पथकाने केल्याची माहिती सूत्रंनी दिली.
विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा स्थायी निगराणी पथक क्रमांक एक चे प्रमुख अरविंद कांदेलकर हे आपल्या पथकासह बुधवारी (17 एप्रिल) कोलशेत, सँडोज बाग लोढा आमरा इमारतीजवळ सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास गस्त घालत असतांना त्यांना ही रोकड नेणारी कार संशयास्पदरीत्या आढळली. वाहन चालक तथा एका कंपनीचे मालक असलेल्या दुर्गेश नाडकर्णी यांनी या रोकडबाबत समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे या पथकाने ती जप्त केली आहे. आयकर विभाग आणि पोलीस पथकाकडूनही याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. नाडकर्णी यांची कन्स्ट्रक्शन कंपनी असून उप कंत्रटदाराच्या कामाची रक्कम देण्यासाठी ते जात होते, असा दावा त्यांनी पोलिसांकडे केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीची आयकर विभागाच्या मार्फतीने तथ्यता पडताळण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगिातले.