राज्यात 19 % जलसाठा!

By Admin | Published: June 27, 2014 01:13 AM2014-06-27T01:13:37+5:302014-06-27T01:13:37+5:30

लांबलेल्या पावसाने यंदा राज्यात पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे.

19% water storage in the state! | राज्यात 19 % जलसाठा!

राज्यात 19 % जलसाठा!

googlenewsNext
>अकोला : लांबलेल्या पावसाने यंदा राज्यात पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे. तब्बल तीन आठवडे पाऊस लांबला असून, आणखी आठवडाभर पावसाची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अशातच जलसाठय़ातून मोठय़ा प्रमाणात उपसा होत असल्याने आणि बाष्पीभवनही होत असल्याने, राज्यातील मोठे, मध्यम आणि लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये अवघा 19 टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
राज्यातील 6 प्रादेशिक विभागांतील 2441 मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये बुधवार्पयत 7155 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. गतवर्षी 26 जूनर्पयत राज्यात 81क्क् दलघमी साठा होता. या वर्षी लांबलेल्या पावसाळ्यामुळे राज्यातील पाणीसाठय़ाची स्थिती अधिक गंभीर होत आहे. पुणो विभागाला याचा सर्वाधिक फटका बसला असून, विभागात जलसाठय़ांमध्ये बुधवार्पयत केवळ 13 टक्के जलसाठा होता. नाशिक विभागात 15 तर मराठवाडय़ात 17 टक्के जलसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील प्रकल्पांमध्ये 39 आणि अमरावती विभागातील प्रकल्पांमध्ये 3क् टक्के जलसाठा असल्याने या विभागांमध्ये तूर्तास पाण्याची समस्या गंभीर नाही. 
राज्यात कोकण विभाग वगळता इतरत्र पावसाला अद्याप सुरुवात झालेली नाही. पाऊस लांबल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून, अशा परिस्थितीत राज्यात मदत आणि पुनर्वसन विभागातर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत; परंतु शेतीसाठी सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोणताही पर्याय शासनाकडे नाही. राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी पाऊस कुठेच नाही. 18 जूनर्पयत सरासरीच्या तुलनेत 2क् ते 59 टक्के कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये धुळे, जळगाव, बुलडाणा, वाशिम, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. 6क् ते 99 टक्के कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये नंदुरबार, अकोला, नाशिक, औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, अहमदनगर, पुणो, सातारा, सांगली, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी) 
 
पावसासाठी जिवंत माणूस तिरडीवर!
गोपाळ व्यास
ल्ल बोदवड (जि. जळगाव)
जून महिन्याचा अखेरचा टप्पाही पावसाविना कोरडा जात आहे. पावसासाठी वरुण राजाची आळवणी करण्याचा एक भाग म्हणून बोदवड तालुक्यातील कु:हा हरदो येथे चक्क जिवंत माणसाची तिरडीवरून यात्र काढण्यात आली. 
 पावसाचे कुठलेही चिन्ह नाही. पेरण्या खोळंबलेल्या.. पिण्याच्या पाण्याचे गंभीर होत चाललेले संकट.. चा:याची टंचाई.. या पाश्र्वभूमीवर गावातीलच ज्येष्ठ नागरिक गोपाळ नामदेव महाले यांनाच तिरडीवर झोपविण्यात येऊन वरुण राजाला साकडे घालण्यात आले. ग्रामस्थांनी त्यासाठी अंत्ययात्रेप्रमाणो संपूर्ण साहित्याची जुळवाजुळव केली होती. 
‘राम बोलो भाई राम’ म्हणत ही प्रतीकात्मक अंत्ययात्र स्मशानभूमीर्पयत पोहोचली. पिठापासून बनविण्यात आलेल्या गोळ्याच्या  प्रतिकृतीला भडाग्नी देण्यात आला.
 
राज्यात तीन टक्केच पेरण्या
पुणो : मान्सूनचे आगमन रखडल्याने राज्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. केवळ सिंचनाची सुविधा असलेल्या ठिकाणीच तुरळक पेरण्या झाल्याचे चित्र आहे. राज्याची खरिपाची सरासरी 134.4क् लाख हेक्टर असून, त्यापैकी केवळ 3.49 लाख हेक्टरवर (3 टक्के) पेरण्या झाल्या आहेत. 
राज्यात जून महिन्यात सरासरी 222.1 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र आतार्पयत केवळ 57.4 मिलिमीटर पाऊस झाला आहे. यंदा 2क्12 प्रमाणोच पावसाने मोठी ओढ दिली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत 5क् हजार 9क्क् हेक्टरवर भाताची पेरणी झाली आहे. तर कोकण व कोल्हापूर विभागात भात रोपवाटिका तयार करण्याचे काम सुरू आहे.  (प्रतिनिधी)
 
हवामान विभागाने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. परिणामी पेरण्या आणखी लांबणार आहेत. वेळेत पेरण्या न झाल्याने सर्वच पीकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतक:यांनी कृषी विभागाच्या आपत्कालीन आराखडय़ाप्रमाणो पेरणी करणो गरजेचे आहे.

Web Title: 19% water storage in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.