आमदारांसह युतीच्या 19 कार्यकर्त्यांना दीड वर्षाची शिक्षा !

By admin | Published: May 30, 2016 07:00 PM2016-05-30T19:00:14+5:302016-05-30T19:00:14+5:30

गेल्या काही वर्षापूर्वी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका आमदारांसह युतीच्या 19 कार्यकर्त्यांना दीड वर्षाची शिक्षा जिल्हा सञ न्यायालयाने सोमवारी दिली.

19 workers of one and a half year sentence with MLAs! | आमदारांसह युतीच्या 19 कार्यकर्त्यांना दीड वर्षाची शिक्षा !

आमदारांसह युतीच्या 19 कार्यकर्त्यांना दीड वर्षाची शिक्षा !

Next
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ३० - गेल्या काही वर्षापूर्वी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका आमदारांसह युतीच्या 19 कार्यकर्त्यांना दीड वर्षाची शिक्षा जिल्हा सञ न्यायालयाने सोमवारी दिली. 
गेल्या ११ वर्षापूर्वी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पैठण येथील शिवसेना - भाजपचे  19 पदाधिकारी आणि कार्यकर्ते दोषी आढळले. राज्यभर गाजलेल्या या प्रकरणात सोमवारी जिल्हा सञ न्यायालयाने अंतिम निकाल दिला. कलम 353, 143 मध्ये हे सर्वजण दोषी ठरले. मात्र दरोडा हे कलम शिध्द होऊ शकले नाही.  जून 2005 मध्ये ही घटना घडली होती.  शिक्षा सुनावण्यात आलेल्या मध्ये आमदार संदिपान भूमरे, तालुकाप्रमुख आण्णासाहेब लबडे, माजी तालुकाप्रमुख अरूण काळे, माजी सभापती नंदकुमार पठाडे, भाजपचे जिल्हाऊपाध्यक्ष लक्ष्मण औटे, माजी जि. पं. सदस्य रतन भालेराव  यांचा प्रामुख्याने समावेश आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे जिल्हयाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title: 19 workers of one and a half year sentence with MLAs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.