डोंबिवलीतील 19 वर्षीय हिंदू तरुण घेतोय जैन धर्माची दीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 06:27 PM2018-04-22T18:27:28+5:302018-04-22T18:27:28+5:30
डोंबिवली शहराच्या पूर्व भागातील तुकारामनगरात राहणारा 19 वर्षीय तरुण जैन धर्माची दीक्षा घेणार आहे,.
डोंबिवली - शहराच्या पूर्व भागातील तुकारामनगरात राहणारा मंदार म्हात्रे हा तरुण हिंदू धर्माच्या चालीरीतीमध्ये वाढलेला. त्याच्या शेजारी राहणा-या मधुबेन यांच्या सान्निध्यात आला. त्याच्यासोबत तो जैन मंदिरात जाऊ लागला. त्याला जैन धर्म आवडू लागला. आत्ता त्याने जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक असलेले विधी त्याने पार पाडले आहेत. येत्या 27 एप्रिल रोजी तो विधीवत जैन धर्माची दीक्षा घेत आहे. त्याच्या दीक्षा समारंभास त्याच्या आई वडिलांची मान्यता आहे.
‘भारतात धर्माचे स्वातंत्र आहे हे ते जगाच्या पाठीवर अन्य कुठेही नाही, असे वक्तव्य काही वर्षापूर्वी दिवंगत पोप जॉन पॉल सेकंड यांनी भारत भेटीच्या दरम्यान केलेले केले होते. त्याची प्रचिती पुन्हा एकदा म्हात्रे याच्या दीक्षा समारंभाच्या निमित्ताने येत आहे. लहान पणीचा परिपोष हे मानवी जीवन घडविण्याचे आणि संस्काराचे काम करते. मंदार हा तुकारामनगरात राहत असताना त्याच्या शेजारी मधूबेन नागाडा राहत होत्या. त्या मंदारला मुलाला सारख्या मानत होत्या. मंदारही त्याचा जणूकाही मानसपूत्रच झाला होता. त्याच्या घरी येणो जाणो होते.
जैन मंदिरात जाताना मधूबेन मंदारला प्रार्थनेकरीता नेऊ लागल्या. त्याच्यावर जास्तीत जास्त जैन धर्माच्या प्रार्थनेचा प्रभाव झाला. या संस्काराचा पश्चात मंदारने जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याला त्यावेळी त्याचे वडील सुभाष म्हात्रे यांनी दीक्षा घेणो काही सोपे काम नाही. कठीण असते. त्यावर मंदार याने त्याची पूर्ण मानसिक तयारी झाली असल्याचे ठामपणो वडिलांना सांगितले. दीक्षा घेण्याआधी उद्यापन करावे लागते. त्याकरिता मंदार याने 3 हजार किलो मीटरचा प्रवास पायी केला आहे. त्या परिक्षेत तो खरा उतरला आहे. त्यानंतर त्याला दीक्षा देण्याचा दिवस ठरला आहे. 27 एप्रिल रोजी मंदार हा जैन धर्माची दीक्षा घेत आहे. मंदार हा सोमवंशी क्षत्रिय पठारे समाजाचा होता. आत्ता तो जैन होणार आहे. त्याच्या वडिलांनी सांगितले की, मंदारने त्याच्या मनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याला आमचा विरोध नाही. आम्ही सगळे त्याच्या दीक्षा समारंभास उपस्थित राहणार आहोत. त्याच्या आनंदात आम्हाला आनंद आहे. तो एक चांगले काम करीत आहे. त्याला जो धर्म आवडतो. त्याचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे.