पिंपरीत 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार

By admin | Published: January 14, 2017 11:31 PM2017-01-14T23:31:41+5:302017-01-14T23:36:09+5:30

आजारी असलेल्या आजीला हॉस्पिटलमध्ये भेटायला चाललेल्या मुलीला एसटीस्थानकात नेऊन एकाने बलात्कार केल्याची घटना घटली. येथील संत तुकाराम नगर येथे शनिवारी रात्री ही

19-year-old woman raped | पिंपरीत 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार

पिंपरीत 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार

Next
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 14 - आजारी असलेल्या आजीला हॉस्पिटलमध्ये भेटायला चाललेल्या मुलीला एसटीस्थानकात नेऊन एकाने बलात्कार केल्याची घटना घटली. येथील संत तुकाराम नगर येथे शनिवारी रात्री ही घटना घडली. दरम्यान, पीडित १९ वर्षीय तरुणीने याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. तर आरोपी ४६ वर्षीय भाजी विक्रेता या घटनेनंतर पसार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पीडितेच्या आजीवर महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्येवर उपचार सुरु आहेत. शनिवारी ती आजीला भेटण्यासाठी जात होती. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये सोडतो म्हणत आरोपीने तिला दुचाकीवर बसविले. त्यानंतर वल्लभनगर एसटी स्थानकाच्या आवारात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यावेळी पिडितेच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. या प्रकारानंतर आरोपी पसार झाला. एसटी स्थानकाच्या सुरक्षा सुरक्षकाने पिडितेच्या डोक्याला लागल्याचे पाहून रिक्षात बसवून तिला वायसीएम हॉस्पिटलला पाठवून दिले. 
दरम्यान, तरुणीवर प्राथमिक उपचार सुरू करतानाच आजीला भेटण्यासाठी आलेल्या नातेवाइकांनी पीडितेला जखमी अवस्थेत पाहिले. ते तिला संत तुकाराम नगर पोलीस चौकीत घेऊन आले. तेथे महिला पोलीस कर्मचा-यांनी तिची चौकशी केल्यानंतर ही घटना उघड झाली. त्यानंतर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार पळसुले, सहाय्यक निरीक्षक गजानन कडाळे, फौजदार रत्ना सावंत, हरिश माने आदींनी घटनास्थळी धाव घेतली. फौजदार रत्ना सावंत यांनी पीडितेची चौकशी केल्यावर आरोपीचे नाव निष्पन्न झाले असून, पथक त्याच्या मागावर रवाना झाले आहे. पीडितेची मानसिकस्थिती ठीक नसल्याचे तिच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. या घटनेचा पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: 19-year-old woman raped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.