१.९१ लाखांचे ३६ मोबाईल जप्त
By Admin | Published: July 29, 2016 05:11 PM2016-07-29T17:11:07+5:302016-07-29T17:11:07+5:30
फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने चोरट्यांना शोधण्यासाठी मोहीम आखली होती. या पथकाने शुक्रवारी एका आरोपीस अटक करून त्यांच्याकडील १ लाख ९१ हजार २०० रुपयांचे ३६ मोबाईल जप्त केले.
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २९ : मागील काही महिन्यांपासून सोलापूर शहरात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यामुळे फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने चोरट्यांना शोधण्यासाठी मोहीम आखली होती. या पथकाने शुक्रवारी एका आरोपीस अटक करून त्यांच्याकडील १ लाख ९१ हजार २०० रुपयांचे ३६ मोबाईल जप्त केले.
प्रशांत मारुती चिकले (वय ४०,रा. बसवनगर, भवानी पेठ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल चोर चिकले यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने शहरातील सिध्देश्वर मंदिर, बसस्थान परिसर, विजापूर वेस, नवीपेठ अशा विविध भागातून मोबाईल चोरल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांच्याकडून १ लाख ९१ हजार २०० रुपयांचे ३६ मोबाईल जप्त केले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, पोलीस उपआयुक्त परिमंडळ अपर्णा गित्ते, सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष नेवे, पोलीस निरीक्षक विजय साळुंखे, पोलीस निरीक्षक इक्बाल सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शैलेश खेडकर,पोलीस नाईक प्रतुल सुरवसे, पोहेकॉ. मारुती बनकर, राजकुमार तोळनुरे, फुलचंद जाधवर, शिव लोहार, सचिन हार, शितल शिवशरण, दिलीप विधाते, कुंदन खटके, रामकृष्ण जाधव, राहुल आवारे, कृष्णात कोळी, मनोज राठोड, सागर मुटकुळे, लेंडवे आदींनी ही कामगिरी केली.