१९ हजार कोटींची कृषी वीजबिल थकबाकी

By admin | Published: June 29, 2017 01:37 AM2017-06-29T01:37:03+5:302017-06-29T01:37:03+5:30

राज्यातील शेतकऱ्यांकडे १९ हजार १३१ कोटी रुपयांची कृषी वीजबिल थकबाकी असून या थकबाकीपैकी दंड आणि व्याजाची रक्कम ८ हजार २५ कोटी रुपये आहे.

19,000 crore agricultural electricity bill outstanding | १९ हजार कोटींची कृषी वीजबिल थकबाकी

१९ हजार कोटींची कृषी वीजबिल थकबाकी

Next

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांकडे १९ हजार १३१ कोटी रुपयांची कृषी वीजबिल थकबाकी असून या थकबाकीपैकी दंड आणि व्याजाची रक्कम ८ हजार २५ कोटी रुपये आहे. ते माफ करण्याची मागणी आता पुढे आली आहे.
ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्रालयात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत सांगितले की, पूर्ण १९ हजार कोटींची वीज थकबाकी माफ करणे अजिबात शक्य होणार नाही. दंड आणि व्याजाची रक्कम माफ करण्याचा विचार केला जाऊ शकतो. अर्थात राज्यावर आधीच ३४ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा बोजा पडलेला असताना वीज थकबाकीचा दंड व व्याजाची रक्कम माफ करणे कितपत शक्य होईल, हा प्रश्न आहे. कारण, कोणतीही थकबाकी माफ करायची तर तेवढी रक्कम राज्य शासनाला अदा करावी लागेल.
कृषी वीज थकबाकीदारांची जिल्हावार थकबाकी (आकडे कोटी रु.मध्ये) अकोला २४८, बुलडाणा ७५४, वाशिम २९३, अमरावती ६३९, यवतमाळ ७२३, औरंगाबाद १३१९, जालना ९३१, सातारा १७९, सोलापूर २०९७, ठाणे ०.६२, चंद्रपूर ३३ भंडारा ६० गडचिरोली २२, गोंदिया ३५, धुळे ५८४, जळगाव १५११, नंदुरबार ३४८, पालघर ३, रायगड १.२५, रत्नागिरी ०.३९, सिंधुदुर्ग ०.३२, कोल्हापूर ७९, सांगली ३५४, बीड १०८६, लातूर ६९९, उस्मानाबाद ८७२, नागपूर २०५, वर्धा ८६, हिंगोली ४८७, नांदेड ८७१, परभणी ७१८, अहमदनगर २०८१, नासिक ८८९, पुणे ९१५.

 

Web Title: 19,000 crore agricultural electricity bill outstanding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.