1993 मुंबई बॉम्बस्फोट : हे आहेत सात आरोपी

By Admin | Published: June 16, 2017 01:33 PM2017-06-16T13:33:21+5:302017-06-16T14:15:39+5:30

1993 साली मुंबईला हादरवून सोडणा-या बॉम्बस्फोट खटल्यातील सहा आरोपींना शुक्रवारी टाडा न्यायालयाने दोषी ठरवले.

1993 Mumbai blasts: These are seven accused | 1993 मुंबई बॉम्बस्फोट : हे आहेत सात आरोपी

1993 मुंबई बॉम्बस्फोट : हे आहेत सात आरोपी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

 
मुंबई, दि. 16 - 1993 साली मुंबईला हादरवून सोडणा-या बॉम्बस्फोट खटल्यातील सहा आरोपींना शुक्रवारी टाडा न्यायालयाने दोषी ठरवले. एअर इंडिया इमारतीसह, मुंबई स्टॉक एक्सचेंज अशा एकूण 12 ठिकाणी त्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. यात भीषण स्फोटांमध्ये 257 निष्पाप नागरीकांचा बळी गेला आणि 713 जखमी झाले.
 
मुस्तफा डोसा 
 
काय आहेत आरोप 
 
गुन्हेगारी कटात सहभाग, बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी दुबईत झालेल्या बैठीकाला मुस्तफा डोसा उपस्थित होता. दाऊद इब्राहिम, टायगर मेमन यांच्यासोबत त्याने बैठका केल्या. मुंबईच्या किना-यावर शस्त्रसाठा उतरवण्यात डोसाने महत्वाची भूमिका बजावली होती. 
 
आणखी वाचा 
 
अबू सालेम 
 
काय आहेत आरोप 
 
दहशतवादी कारवायांसाठी गुन्हेगारी कटात सहभाग. भरुचहून अबू सालेमने मारुती व्हॅनमधून नऊ एके-56 रायफल्स आणि हँड ग्रेनेडस  मुंबईत पाठवल्या होत्या. जानेवारी 1993 मध्ये अभिनेता संजय दत्त, झैबुनीसा काझीच्या घरी ही शस्त्रास्त्र उतरवण्यात आली होती. अनिस इब्राहिमच्या इशा-यावरुन ही शस्त्रास्त्रे या दोघांकडे ठेवण्यात आली होती. अबू सालेमला त्याच्या कृत्यासाठी फाशीची शिक्षा होऊ शकते पण पोर्तुगालकडून फाशीची शिक्षा न देण्याच्या अटीवर त्याचे प्रत्यर्पण झाले आहे. 
 
रियाझ सिद्दीकी 
 
काय आहेत आरोप 
 
गुन्हेगारी कटात सहभाग. रियाझने गुजरातहून सालेमसोबत शस्त्रास्त्र मुंबईत आणली. 
 
कय्यूम शेख 
 
काय आहेत आरोप 
 
निर्दोष सुटका झाली आहे.  स्फोटासाठी अनिस इब्राहिमसोबत मिळून शस्त्रास्त्र भारतात पाठवल्याचा आरोप होता. 
 
ताहेर मर्चंट 
 
काय आहेत आरोप 
 
कटात सहभागी. स्फोट घडवून आणण्यासाठी दुबई आणि मुंबईत झालेल्या बैठकीत सहभागी. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणासाठी मुंबईतून तरुणांना पाकिस्तानात पाठवले.   
 

Web Title: 1993 Mumbai blasts: These are seven accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.