मुंबईत २ ते ५ एफएसआय

By admin | Published: April 28, 2016 05:34 AM2016-04-28T05:34:17+5:302016-04-28T05:46:27+5:30

सुधारित विकास नियोजन आराखड्यात विकासकांवर चटईक्षेत्र निर्देशांकांची खैरात करण्यात आली आहे़

2 to 5 FSI in Mumbai | मुंबईत २ ते ५ एफएसआय

मुंबईत २ ते ५ एफएसआय

Next

मुंबई: सुधारित विकास नियोजन आराखड्यात विकासकांवर चटईक्षेत्र निर्देशांकांची खैरात करण्यात आली आहे़ पूर्वी १ ते ३़५ पर्यंत असलेला एफएसआय आता २ ते पाचपर्यंत दिला जाणार आहे़ तसेच व्यावसायिक बांधकामांना विशेष प्रोत्साहन देऊन पूर्वी ३़५ पर्यंत असलेला एफएसआय सरसकट पाच करण्याची शिफारस आराखड्यातून करण्यात आली आहे़
सन २०१४ ते २०३४ या २० वर्षांसाठी नियोजन विकास आराखडा तयार करण्यात येत आहे़ मात्र या आराखड्याच्या मसुद्यामध्ये असंख्य त्रुटी आढळून आल्याने सर्वत्र तीव्र पडसाद उमटले़ अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आराखड्याच्या मुसद्याला स्थगिती देऊन सुधारणेचे आदेश दिले़ त्यानुसार सुधारित आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे़ या आराखड्यातील तरतुदी पालिकेच्या संकेतस्थळावरुन नागरिकांसाठी खुले करण्यात येत आहे़ याबाबत पालिका आयुक्त अजोय मेहता व विशेष अधिकारी रामनाथ झा यांनी पत्रकारांना माहिती दिली़ त्यानुसार पूर्वी शहरातील इमारतींसाठी एक आणि उपनगरांसाठी १़३३ असलेला एफएसआय थेट दोन करण्यात येणार आहे़
व्यावसायिक बांधकामांना प्रोत्साहन
व्यावसायिक सरसकट पाच एफएसआय दिला जाणार आहे़ सर्व तारांकित हॉटेलसाठी पूर्वी ३ ते साडेतीन असलेला एफएसआय आता पाचपर्यंत दिला जाणार आहे़ जकात उत्पन्न वर्षागणिक कमी होत असल्याने हे आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी पालिकेने या माध्यमातून उत्पन्न वाढविण्याची तयारी सुरु केली आहे़ पालिकेला सर्वसाधारण पाच हजार कोटी वार्षिक उत्पन्न मिळत असते़ व्यावसायिक बांधकामांना प्रोत्साहन दिल्यानंतर हे उत्पन्नाबरोबरच मुंबईत रोजगारही वाढणे अपेक्षित असल्याचे आयुक्त अजय मेहता यांनी स्पष्ट केले़ 
आरे कॉलनीचे आरक्षण रद्द
आरे कॉलनीमध्ये कारशेडसाठी ३० हेक्टर्स जागा तेही सरकारने निश्चित केल्यास राखीव ठेवण्यात येणार आहे़ इतर प्रस्तावित विकास रद्द करण्यात आले आह़े त्यामुळे आरे कॉलनीतील ना विकास क्षेत्र खुले करण्यावरुन पेटलेला वाद संपुष्टात आणण्यात आला आह़े मात्र अडीशे हेक्टर्स जागा झुओलॉजिकल पार्कसाठी राखीव ठेवण्यात आली आह़े.  
दहा लाख घरांसाठी २१०० हेक्टर जमीन
मुंबईत २०२१ पर्यंत लोकसंख्या १२़७९ दशलक्ष असणार आहे़ अल्प उत्पन्न व मध्यमवर्गीय मुंबईकरांना परवडणारी घर उपलब्ध करुन देण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे़ त्यानुसार दहा लाख परवडणारी घर बांधण्यात येणार आहे़ यासाठी ना विकास क्षेत्रात राखीव २१०० हेक्टर्स जागा परवडणाऱ्या घरांसाठी मिळविण्यात येणार आहे़

 

व्यावसायिक एफएसआय कमी पडत होता़ मुंबईत जादा रोजगार वाढविण्यासाठी व्यावसायिक एफएसआय वाढविणो महत्त्वाचे होत़े हा प्रोत्साहन देण्यामागे अधिक व्यवसाय मुंबईकडे आकृष्ट करणो, हेच उद्दिष्ट आह़े

विकास नियोजन आराखडय़ातील महत्त्वाचे मुद्दे

च्नवीन तीन हजार हेक्टर जमीन ही परवडणारी घरे आणि मोकळ्या जागांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आह़े यासाठी ना विकास क्षेत्र, मिठागरे, पर्यटन विकास क्षेत्र, मुंबई पोर्ट ट्रस्ट या माध्यमातून या जमिनीचा वापर होईल.

च्फंजीबल एफएसआय, एफएसआयमध्ये सुसूत्रता या माध्यमातून वर्षाला पाच हजार कोटी रुपये महापालिकेला मिळण्याचा अंदाज आह़े

च्आरक्षित जमिनी पालिकेच्या ताब्यात देण्यासाठी जमीन मालकाला पैसे न देता जादा एफएसआय आणि विकास हस्तांतरण हक्क म्हणजेच टीडीआर देण्यात येणार आहेत़ यामुळे आरक्षण असलेल्या पूर्वीच्या जमिनीही पालिकेच्या ताब्यात येतील़

च्पार्किगची समस्या मोठय़ा प्रमाणात असल्याने नव्याने पार्किग प्राधिकरण नेमण्याची शिफारस आराखडय़ातून करण्यात आली आह़े त्यामुळे मुंबईत नव्या पार्किगच्या जागा तयार होतील़ देशात अशाप्रकारे पार्किग प्राधिकरण पहिल्यांदाच नेमण्यात येणार आह़े

च्नव्या विकास आराखडय़ाच्या माध्यमातून 8क् लाख रोजगार तयार होणार आह़े

च्मुंबईत सार्वजनिक मोकळ्या जागांमध्ये वाढ केली जाईल. 

च्पूर्वी 32 मी़र्पयत असलेल्या इमारतींना हायराईज म्हटले जात होत़े मात्र आता 24 मी़ उंचीच्या इमारती हायराईज म्हणून गणल्या जाणार आहेत़

 

Web Title: 2 to 5 FSI in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.