२ कोटी जनता अद्यापही दारिद्र्य रेषेखाली

By admin | Published: October 17, 2015 02:59 AM2015-10-17T02:59:27+5:302015-10-17T02:59:27+5:30

दारिद्र्य निर्मूलन दिनानिमित्त राज्यातील दारिद्र्य रेषेखालील लोकांची यादी पाहता, भयानक वास्तव समोर येते. राज्यातील तब्बल १ कोटी ९७ लाख ९२ हजार

2 crore people still under poverty line | २ कोटी जनता अद्यापही दारिद्र्य रेषेखाली

२ कोटी जनता अद्यापही दारिद्र्य रेषेखाली

Next

मुंबई : दारिद्र्य निर्मूलन दिनानिमित्त राज्यातील दारिद्र्य रेषेखालील लोकांची यादी पाहता, भयानक वास्तव समोर येते. राज्यातील तब्बल १ कोटी ९७ लाख ९२ हजार लोक अजूनही दारिद्र्य रेषेखाली जीवन कंठत आहेत, असे नियोजन आयोगाच्या अहवालावरून स्पष्ट होते. अर्थातच, राज्यातील तब्बल १५ ते २० टक्के लोक अजूनही दारिद्र्यात खितपत आहेत. त्यांच्या किमान गरजा पुरविण्यासाठीही शासनाच्या योजना कुचकामी ठरत आहेत.
राज्यातील ग्रामीण भागातील गरिबांची संख्या अधिक आहे. ग्रामीण भागात तब्बल १ कोटी ५० लाख ५६ हजार लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, तर शहरी भागात ४७ लाख ३६ लाख लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. २०११ साली झालेल्या जनगणनेच्या निष्कर्षातून ही आकडेवारी पुढे आली आहे.

Web Title: 2 crore people still under poverty line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.