२ नगरपालिका, १८ नगरपंचायतींची निवडणूक
By admin | Published: December 5, 2015 09:07 AM2015-12-05T09:07:26+5:302015-12-05T09:07:26+5:30
जामखेड व शेवगाव या दोन नवनिर्मित नगरपारिषदांसह राज्यातील १८ नगर पंचायती तसेच १० नगर परिषदांमधील १६ रिक्त जागांसाठी १० जानेवारीला मतदान होणार आहे.
मुंबई : जामखेड व शेवगाव या दोन नवनिर्मित नगरपारिषदांसह राज्यातील १८ नगर पंचायती तसेच १० नगर परिषदांमधील १६ रिक्त जागांसाठी १० जानेवारीला मतदान होणार आहे. निकाल ११ जानेवारीला जाहीर करण्यात येईल.
जामखेड व शेवगाव (जि. अहमदनगर) या दोन नगर परिषदांच्या प्रत्येकी २१ जागा आहेत; तर १८ नगरपंचायतींच्या प्रत्येकी १७ जागा आहेत. पोटनिवडणुकांसह एकूण ३६४ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर ती संपुष्टात येईल.
निवडणूक होत असलेल्या नगर पंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी:
रायगड - खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर. नंदुरबार - अक्कलकुवा, धडगाव- वडफळ्या- रोषमाळ बु. अहमदनगर - जामखेड, शेवगाव. नाशिक- दिंडोरी नांदेड - हिमायतनगर, नायगाव. उस्मानाबाद - वाशी. हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ. वाशीम - मालेगाव, मानोरा. चंद्रपूर - गोंडपिपरी, कोरपना, जिवती.
पोटनिवडणूक होत असलेल्या नगर परिषद व प्रभाग क्र मांक असा: रत्नागिरी - २ अ, श्रीरामपूर (अहमदनगर)- ३ अ. भुसावळ (जळगाव)- ३ क,६अ. जामनेर (जळगाव)- १ क भोकर (नांदेड)-११, निलंगा (लातूर)-५ ब. नेर-नबाबपूर (यवतमाळ)- १ अ, वर्धा- ९ ड. हिंगणघाट (वर्धा)- २ अ, २ ब, ५ ब, ६ अ, ६ ड व ७ ड. तुमसर (भंडारा)-१ ड. (विशेष प्रतिनिधी)