पुण्यातून 2 टन गोमांस जप्त
By Admin | Published: April 16, 2017 04:29 PM2017-04-16T16:29:59+5:302017-04-16T16:29:59+5:30
धाराशिव जिल्ह्यातून पुण्यात गोमांस विक्रीसाठी आणत असलेला टेम्पो गोरक्षकांनी सापळा रचून पकडला
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 16 - धाराशिव जिल्ह्यातून पुण्यात गोमांस विक्रीसाठी आणत असलेला टेम्पो गोरक्षकांनी सापळा रचून पकडला आणि त्यातून 2 टन गोमांस जप्त करण्यात आले. अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाने हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी
चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रकचालक कलिमा अब्दुल कादर पालकर (वय वय 42, रा. लोहियानगर, गंजपेठ), क्लिनर हाजी हारून शेख (वय 30, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) या दोघांसह गायी कापणारा, विकत घेणारा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल
भारतीय कृषी गोसेवा संघाचे सदस्य, मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे कसाई महोल्ल्यात 12 गायी व वासरांची कत्तल करून ती कोंढवा येथील जुबेर कुरेशी व सलमान कुरेशी याच्या दुकानात विक्रीसाठी आणले जात असल्याची माहिती शिवशंकर स्वामी यांना मिळाली. त्यानुसार रविवार सकाळी सहा पासून गोरक्षकांनी चंदननगर येथे खराडी बायपासवर सापळा रचला. त्यांना आयशर टेम्पो एमएच 12 एचडी 7788 यातून
गोमांस वाहतूक होत असल्याचे दिसले. त्यांनी त्वरित पोलिसांना माहिती देऊन टेम्पोची पाठलाग सुरू केला.
हा टेम्पो कोरेगाव पार्क येथे जर्मन बेकरीच्या जवळ पकडण्यात आला. पोलिसांनी चालकला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, हे गोमांस परंड्यावरून आणले असल्याची कबुली दिली. पोलिसांच्या समोर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल देशपांडे यांनी गाडीची तपासणी केली असता त्यातील मांस हे गायीचे असल्याचे सांगितले. त्यानुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सुधारित 1995चे कलम 5 ( क ), 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.