२० अभियंत्यांचे निलंबन
By admin | Published: September 23, 2014 05:25 AM2014-09-23T05:25:51+5:302014-09-23T05:25:51+5:30
मर्जीतील ठेकेदारांना प्रभागस्तरावरील छोट्या कामांचे कंत्राट मिळवून देणाऱ्या २० अभियंत्यांना निलंबित
मुंबई : मर्जीतील ठेकेदारांना प्रभागस्तरावरील छोट्या कामांचे कंत्राट मिळवून देणाऱ्या २० अभियंत्यांना निलंबित करण्याचा तसेच त्या ठेकेदारांना काळ््या यादी टाकण्याचा निर्णय पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी घेतला आहे़ परंतु यात आर्थिक नुकसान झालेले नाही, म्हणजे यास भ्रष्टाचार म्हणता येणार नाही, असा अजब युक्तिवाद मांडून त्यांनी सर्वांनाच धक्का दिला़
प्रभागस्तरावरील छोट्या कामांचे कंत्राट ई निविदा पद्धतीने देण्यात येते़ मात्र स्पर्धेत केवळ मर्जीतील ठेकेदारच राहावेत, यासाठी रात्रीच्या वेळेत लिंक ब्लॉक करण्यात येत होती. नऊ प्रभागांमध्ये हा भ्रष्टाचार घडला असून, यामध्ये २० अभियंते गुंतलेले असल्याचा ठपका टेस्ट आॅडिट व्हिजिलन्स आॅफिसरने (टावो) ठेवला़ याचे तीव्र पडसाद स्थायी समिती व सभागृहात उमटले़
अखेर आयुक्तांनी गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत अभियंत्यांनी केलेले हे उद्योग मान्य केले़ या प्रकरणात दोषी २० अभियंत्यांच्या निलंबनाचे संकेतही त्यांनी दिले़ परंतु ४९ कामांमध्ये हा गैरप्रकार आढळून आला असून, ही कामे पूर्ण झालेली आहेत. यात आर्थिक नुकसान झालेले नाही, त्यामुळे हा भ्रष्टाचार म्हणू शकत नाही, असा अजब दावा आयुक्तांनी व्यक्त केला़
ई निविदेवर आयुक्त ठाम
ई निविदा प्रक्रिया बंद करून वॉर्डातील कामांसाठी सिव्हिल
वर्क कॉन्ट्रेक्टर परत आणण्याची मागणी नगरसेवकांनी लावून धरली आहे़ ई निविदेतील कथित भ्रष्टाचारामुळे या मागणीने आणखी जोर धरला आहे़ परंतु शासकीय धोरणानुसार ४० टक्के कामे ई निविदेच्या माध्यमातून देणे भाग असल्याने ही पद्धत सुरूच राहील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)