रेबीज लसीकरणासाठी २० लाखांचा निधी

By admin | Published: March 14, 2016 01:24 AM2016-03-14T01:24:42+5:302016-03-14T01:24:42+5:30

शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया व अँटी रेबीज लसीकरणासाठी आरोग्य विभागाला वर्गीकरणातून २० लाख रुपयांचा निधी देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे़

20 lakhs funds for rabies vaccination | रेबीज लसीकरणासाठी २० लाखांचा निधी

रेबीज लसीकरणासाठी २० लाखांचा निधी

Next

पुणे : शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया व अँटी रेबीज लसीकरणासाठी आरोग्य विभागाला वर्गीकरणातून २० लाख रुपयांचा निधी देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे़
महापालिकेच्या आरोग्य विभाग शहरातील मोकाट व भटकी कुत्र्याची नसबंदी शस्त्रक्रिया व अ‍ॅन्टीरेबीज लसीकरण करते. गेल्या चार वर्षांत जवळपास ३४ हजार ४८४ कुत्र्यांची नसबंदी व अ‍ॅन्टीरेबीज लसीकरण करण्यात आले आहे. एका कुत्र्यावर नसबंदी शस्त्रक्रिया व रेबीज लसीकरण करण्यासाठी ५९५ रुपये खर्च येतो. यावर्षी कुत्र्यांची नसंबदी व लसीकरणाचे काम ब्लू क्रॉस सोसायटी, पीपल्स फॉर अ‍ॅनिमल आणि सोसायटी फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन या संस्थांना देण्यात
आले आहे. या तीन संस्थांनी डिसेंबरपर्यंत ६ हजार ८६० कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया व अ‍ॅन्टीरेबीज लसीकरण केले आहे. यासाठी या संस्थाना ४० लाख रुपये आदा करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडील निधी संपल्याने भटक्या व मोकाट कुत्र्यांचे नसंबदी व लसीकरणाचे काम थांबण्याची शक्यता निर्माण झाली होते.

Web Title: 20 lakhs funds for rabies vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.