मंत्रिमंडळात २० मंत्री अन् सभागृहात एकटेच; भास्कर जाधवांनी अब्दुल सत्तारांना घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 06:57 PM2022-08-18T18:57:46+5:302022-08-18T18:58:49+5:30

Maharashtra Vidhan Sabha Live: कोकणातला मत्स्यविकास मंत्री नाही. ७२० किमी समुद्रकिनारा कोकणाला लाभला परंतु प्रत्येक वेळी मत्स्यविकास मंत्री बाहेरचे होते. ज्यांचा मच्छिमारीशी काहीही संबंध नाही असं भास्कर जाधव म्हणाले.

20 ministers in the cabinet and only one in the house; Shiv sena mla Bhaskar Jadhav criticized Abdul Sattar | मंत्रिमंडळात २० मंत्री अन् सभागृहात एकटेच; भास्कर जाधवांनी अब्दुल सत्तारांना घेरलं

मंत्रिमंडळात २० मंत्री अन् सभागृहात एकटेच; भास्कर जाधवांनी अब्दुल सत्तारांना घेरलं

googlenewsNext

मुंबई - कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. १५७ शेतकऱ्यांचा मृत्यू पूरामुळे झाला आहे. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. संपूर्ण नदीनं आपला प्रवाह बदलला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली. कोकणात ८ टक्क्याहून १२-१४ टक्के जमिनी उताराच्या आहेत. त्यामुळे मोठा गाळ नदीपात्रात जमा होतो असं शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत म्हटलं. 

विधानसभेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राची पूरस्थिती आणि शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने झालेले नुकसान यावर चर्चा सुरू होती. यावेळी भास्कर जाधव म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मृत्यूसह साडेपाचशे जनावरं मृत्युमुखी पडले आहेत. राज्यातील काही भागात दुबार पीक पेरणी होते. कोकणात दुबार पीक पेरणी होत नाही. कोकणातील शेतकरी कर्ज घेत नाही. त्यामुळं कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. निसर्गाच्या लहरीपणावर कोकणतील शेती आहे. मग कोकणातल्या शेतकऱ्यांना काय मदत करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

तसेच कोकणात १०-२० एकर शेती असणं म्हणजे सर्वात मोठा शेतकरी. सपाट जमीन नाही. एकाबाजूला समुद्रकिनारा, दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्या दोघांमधील जागा म्हणजे कोकण. कोकणातील शेतकऱ्यांना मदत करताना ३ गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. कोकणाची स्वतंत्र चर्चा कधीच सभागृहात झाली नाही. सरकारकडे उत्तर देण्यासारखं काही नाही असं भास्कर जाधव यांनी सभागृहात म्हटलं. 

दरम्यान, कोकणातला मत्स्यविकास मंत्री नाही. ७२० किमी समुद्रकिनारा कोकणाला लाभला परंतु प्रत्येक वेळी मत्स्यविकास मंत्री बाहेरचे होते. ज्यांचा मच्छिमारीशी काहीही संबंध नाही. आज सभागृहात चर्चा घडवत असताना हे सरकार शेतकऱ्यांबाबत किती गंभीर आहे ते मंत्र्यांच्या उपस्थितीवरून दिसून येते. मंत्रिमंडळात मंत्री २० आणि सभागृहात मंत्री कोण सगळ्या विषयात सर्वज्ञानी अब्दुल सत्तार आहे. मत्स्यविकास मंत्री असायला हवे होते असा टोला भास्कर जाधव यांनी सत्तारांना लगावला. त्याचसोबत मविआ सरकारनं कोरोना संकट असतानाही शेतकऱ्यांना मदत केली. चक्रीवादळात तेव्हाचे विरोधी पक्षनेते फडणवीस फिरत होते. परंतु केंद्राकडून मदत आणू शकले नाहीत. कोकण कर्ज घेत नाही. कर्ज घेतले असेल तर वेळेवर फेडतो. गुवाहाटीच्या अर्ध्या गप्पा नंतर बोला. त्यावर जास्त चर्चा नको. मंत्र्यांनी बोलताना विचार करावा मागील सरकारमध्ये तुम्हीही मंत्री होता असाही चिमटा जाधवांनी सत्तारांना काढला. 
 

Web Title: 20 ministers in the cabinet and only one in the house; Shiv sena mla Bhaskar Jadhav criticized Abdul Sattar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.