उद्योगांसाठी २० टक्के जागा राखीव

By admin | Published: October 1, 2016 02:51 AM2016-10-01T02:51:50+5:302016-10-01T02:51:50+5:30

एमआयडीसीच्या भूखंड वाटपासाठी आॅनलाईन प्रक्रि या अवलंबिण्यात येणार आहे.वेबसाईटवर उपलब्ध असलेले सर्व भूखंड,त्यांचे क्षेत्रफळ याची माहिती देण्यात येणार आहे

20 percent seats reserved for the industries | उद्योगांसाठी २० टक्के जागा राखीव

उद्योगांसाठी २० टक्के जागा राखीव

Next

मुुंबई : एमआयडीसीच्या भूखंड वाटपासाठी आॅनलाईन प्रक्रि या अवलंबिण्यात येणार आहे.वेबसाईटवर उपलब्ध असलेले सर्व भूखंड,त्यांचे क्षेत्रफळ याची माहिती देण्यात येणार आहे.येत्या महिनाभरात भूखंड वाटपांची प्रक्रि या पार पाडण्यात येईल.यातील २० टक्के भूखंड हे लघू व मध्यम उदयोजकांसाठी राखीव ठेवण्यात येतील, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज पत्र परिषदेत सांगितले.
लघुउदयोगांना बांधीव गाळे देखील बांधण्यात येणार आहेत. हे भाडे मालकी तत्वाने किंवा भाडेकरारावर देण्यात येतील.पिंपरी-चिंचवड,वागळे इस्टेट,अहमदनगर,हिंगणाघाट,जळगाव एमआयडीसीमध्ये हे बांधीव गाळे बांधण्यात येणार आहेत. एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते सुधारण्यात येणार आहेत. यापुढे घनकचऱ्याची विल्हेवाट एमआयडीसीमार्फतच लावण्यात येणार आहे.रासायनिक सांडपाणी प्रक्रि या करण्यासाठी केंद्र,राज्य व उद्योजक अशा तिघांकडून निधी उभारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मेक इन इंडियांतर्गत महाराष्ट्रात उद्योग उभारणीचे २६२ सामंजस्य करार प्रत्यक्षात आले असून या प्रकल्पांची उभारणी सुरू झालेली आहे. लघु व सूक्ष्म उद्योगात ४७४ करारांचे काम प्रत्यक्षात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत शेंद्रा बिडकीन येथे उभारण्यात येणार असलेल्या औद्योगिक नागरी वसाहतती उद्योगांना भूखंड वाटप करण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरु करण्यात येईल, असे देसाई यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

व्यंगचित्राचा चटका अन् फटका बसल्याची कबुली
व्यंगचित्रांचा चटका आणि फटका आतापर्यंत अनेकांना बसला आहे. तोच आम्हालादेखील (शिवसेना) बसला आहे, अशी कबुली शिवसेनेचे नेते असलेले सुभाष देसाई यांनी या पत्र परिषदेत दिली. ते म्हणाले की, ते व्यंगचित्र ही शिवसेनेची भूमिका नव्हती. त्यावरून माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

Web Title: 20 percent seats reserved for the industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.