पाच वर्षांखालील २० टक्के बालकांना कृषपणाचा धोका

By admin | Published: January 17, 2017 02:49 AM2017-01-17T02:49:17+5:302017-01-17T02:49:17+5:30

मुंबईसारख्या मेट्रो शहरांतही कुपोषणाच्या समस्येने घुसखोरी केली आहे.

20 percent of the under-five children are at risk of agriculture | पाच वर्षांखालील २० टक्के बालकांना कृषपणाचा धोका

पाच वर्षांखालील २० टक्के बालकांना कृषपणाचा धोका

Next


मुंबई : मुंबईसारख्या मेट्रो शहरांतही कुपोषणाच्या समस्येने घुसखोरी केली आहे. मुंबईतील पाच वर्षांखालील २० टक्के बालकांना कृषपणाचा धोका असल्याचे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ‘स्नेहा’ आणि ‘क्राय’ या संस्थांनी २०११ ते २०१५ या काळात ‘एम-ई’ आणि ‘एल’ विभागात सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, मुंबईतील बालकांमध्येही लुकडेपणाची गंभीर समस्या दिसून आली आहे.
स्नेहा आणि क्राय या संस्थांनी २०११ सालापासून कुपोषणाचा प्रकार असणाऱ्या कृषपणाविषयी प्रभावी जनजागृती उपक्रम राबविले आहेत. मुंबईतील धारावी, कुर्ला, मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर या भागांत हे सर्वेक्षण करण्यात आले. या अहवालानुसार, येथील मुलांमधील कृषपणाचे प्रमाण १८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर घसरले आहे.
या कृषपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी घरोघरी जाऊन भेटी घेणे, वैयक्तिक समुपदेशन, अभियान आणि सामूहिक बैठक अशा उपक्रमांमुळे हे प्रमाण कमी होत असल्याचे ‘स्नेहा’ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व्हेनिसा डिसोझा यांनी सांगितले.
पोषक आहाराच्या अभावामुळे आणि पालकांच्या अज्ञानामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. पालकांचा कल मुलांना पॅकफूड, जंकफूड देण्याकडे असतो. जंकफूड हे कृषपणाचे मुख्य कारण असल्याची माहिती या वेळी डिसोझा यांनी
दिली. सरकारने कुपोषणाच्या या अहवालाबाबत लक्ष देणे गरजेचे आहे. काही भागांपुरते मर्यादित असणारे हे सर्वेक्षण भविष्यात सरकारने पाऊल उचलले तर संपूर्ण मुंबईकरिता राबविण्यात येईल. त्यामुळे कुपोषणाची समस्येचे उच्चाटन करण्यासाठी
खऱ्या अर्थाने मदत होईल, अशी माहिती ‘क्राय’चे प्रादेशिक संचालक क्रिएन राबाडी यांनी दिली. (प्रतिनिधी)
>वर्गवारी२०११२०१६
सहा महिन्यांपर्यंत स्तनपान करणारी बालके ६२६४
२० वर्षांखालील गर्भवती १७४
घरात जन्माला आलेली बालके१५१२
कुटुंबनियोजन करणाऱ्या महिला३४५९
कृषपणाची समस्या असलेली बालके १७१२
लसीकरण केलेली बालके६६७३
>अशी धक्कादायक आकडेवारी ‘स्नेहा’ आणि ‘क्राय’ या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षात आढळली आहे

Web Title: 20 percent of the under-five children are at risk of agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.