तालुक्यातील २० तलाठ्यांच्या बदल्या, ५ सज्जे रिक्तच

By Admin | Published: June 7, 2016 07:15 AM2016-06-07T07:15:48+5:302016-06-07T07:29:49+5:30

औसा : तालुक्यात ४६ तलाठे सज्जे असून त्यापैकी २० तलाठ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यात १४ प्रशासकीय तर ६ विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत.

20 talisman transfers in the taluka, 5 ready to leave | तालुक्यातील २० तलाठ्यांच्या बदल्या, ५ सज्जे रिक्तच

तालुक्यातील २० तलाठ्यांच्या बदल्या, ५ सज्जे रिक्तच

googlenewsNext

औसा : तालुक्यात ४६ तलाठे सज्जे असून त्यापैकी २० तलाठ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यात १४ प्रशासकीय तर ६ विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. २ तलाठी रेणापूरहून औसा तालुक्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत.
तलाठ्याचे नाव, सध्याचे ठिकाण आणि कंसात बदली झालेले ठिकाण : टी़ आऱ सगर - समसापूर (मातोळा), एस़ एस़ ठोंबरे- मातोळा (हासेगाव), एस़ के़ फडणीस- चलबुर्गा (हारेगाव), व्ही़ एच़ बिराजदार- करजगाव (नागरसोगा), के़ एम़ गहिरेवार- नांदुर्गा (आशिव), व्ही़ एम़ पवार- सिरसल (नांदुर्गा), डी़ एऩ वाघे- दावतपूर (चलबुर्गा), एऩ एस़ जाधव- लोदगा (भुसणी), आऱ व्ही़ बबणे- यल्लोरी (करजगाव), बी़ एम़ कोळी- कवळी (समदर्गा), एऩ आऱ यादव- बिरवली (शेरा),ए़व्ही़ जोगदंड- नागरसोगा (बेलकुंड), एस़ डी़ चव्हाण- पानगाव (बोरगाव), आऱ एस़ पटेल- औसा (किल्लारी) या चौदा तलाठ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत़ तसेच एम़ एस़ झुंजकर- बेलकुंड (औसा), आऱ डी़ जगताप- भुसणी (लोदगा), एस़ के़ गवळी- किल्लारी (दावतपूर), ए़ व्ही़ गरगटे- शेरा (कारला), ए़ एम़ चाफेकरंडे- तळणी (जावळी), ए़ बी़ सूर्यवंशी- आशिव (बुधोडा) या सहा जणांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत़

Web Title: 20 talisman transfers in the taluka, 5 ready to leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.