२० हजार गुंतवणूकदारांना फसवले
By Admin | Published: May 15, 2017 06:24 AM2017-05-15T06:24:17+5:302017-05-15T06:24:17+5:30
मध्य प्रदेशातील भोपाळच्या एका कंपनीने पाच वर्षांत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून येथील २० हजार गुंतवणूकदारांना ३५ कोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : मध्य प्रदेशातील भोपाळच्या एका कंपनीने पाच वर्षांत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून येथील २० हजार गुंतवणूकदारांना ३५ कोटी रुपयांना गंडा घातला. रविवारी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल झाली आहे.
कंपनीचे संचालक अभिषेक चौहान (भोपाळ, म.प्र.), हरीश शर्मा (शहाजापूर, म.प्र.), लखन सोनी (शहाजापूर, म.प्र.), प्रबल प्रताप सिंह (ग्वालीयर, म.प्र.), फुल सिंह चौधरी (राजगड, म.प्र.) व निरंजन सक्सेना (भोपाळ, म.प्र.) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी भगीरथ कटके हे १० ते १२ मित्रांसह ५ मे २०१२ रोजी नगरला एनआयसीएल (निर्मल इफ्रा होम कार्पोरेशन लिमिटेड ) कंपनीच्या बैठकीस हजर होते. कंपनीचे डायरेक्टर अभिषेक चौहान, हरीश शर्र्मा, लखन सोनी, प्रबल प्रताप सिंह, फुल सिंह चौधरी व निरंजन शर्र्मा यांनी योजनांची माहिती दिली. कंपनी रिअल इस्टेट व कर्जरोखेचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. कंपनीच्या नियमाप्रमाणे काम केल्यास कमिशन देण्याचे सांगण्यात आले. कटकेंसह इतरांचा कंपनीवर विश्वास बसला.
त्यानंतर त्यांनी कामास सुरुवात केली. व्यवसाय वाढल्याने हमाल पंचायतमध्ये भाडेतत्त्वावर कार्यालय घेतले. कर्जरोखे, प्लॉट पाडून विकणे, साबण, क्रीम, चहा, मिनरल वॉटर असे व्यवसाय सुरू करून झालेल्या फायद्यातून गुंतवणूकदारांना लाभ देण्याचे आश्वासन देण्यात आले.