२0 हजार नोक-या मिळणार
By Admin | Published: January 29, 2015 06:03 AM2015-01-29T06:03:15+5:302015-01-29T06:03:15+5:30
जगविख्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज येथे भेट घेऊन मुंबई आणि पुणे येथे डाटा सेंटर्स
मुंबई : जगविख्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज येथे भेट घेऊन मुंबई आणि पुणे येथे डाटा सेंटर्स उभारणार असल्याचे सांगितले. त्यासाठी कंपनी २,१०० कोटी रुपये खर्च करणार असून, ती आशिया खंडातील सर्वात मोठी डाटा सेंटर्स असतील.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले, की स्वित्झर्लंडमधील दाव्होसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत आपली कॉग्निझंटचे प्रमुख गॉर्डन कोबर्न यांच्याशी चर्चा झाली. ही कंपनी पुण्याजवळील प्रकल्पाचा विस्तार करून २० हजार नवे रोजगार निर्माण करणार आहे. मायक्रोसॉफ्टच्या मदतीने लवकरच डिजिटल ओळखपत्र तयार करण्याची योजना सुरू करणार असून, आधार कार्डच्या माहितीचा आधार घेऊन अन्य सर्व विविध ओळखपत्रांना एकत्रित करून हे डिजिटल ओळखपत्र तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
जीई इलेक्ट्रिक कंपनी ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. प्रामुख्याने डॉएच बँक, जेपी मॉर्गन, नोमुरा फायनान्शियल सव्हिर्सेस, स्विस अॅग्रिकल्चर फायनान्सिंग या कंपन्यांनी मुंबईमध्ये गुंतवणुकीसाठी तत्परता दर्शविली, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)