कपाशीचे २० हजार नमुने नापास!

By Admin | Published: March 8, 2015 02:01 AM2015-03-08T02:01:36+5:302015-03-08T02:01:36+5:30

भरघोस उत्पादनासाठी बियाणे शुद्ध व दर्जेदार असावे लागते. सदोष व अप्रमाणित बियाण्यांमुळे उत्पादनात मोठी घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

20 thousand samples of Kapashi failed! | कपाशीचे २० हजार नमुने नापास!

कपाशीचे २० हजार नमुने नापास!

googlenewsNext

गजानन मोहोड ल्ल अमरावती
भरघोस उत्पादनासाठी बियाणे शुद्ध व दर्जेदार असावे लागते. सदोष व अप्रमाणित बियाण्यांमुळे उत्पादनात मोठी घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या मूलभूत बाबींचा विचार करुन कृषी विभागाने बीज परीक्षण प्रयोगशाळेत सन २०१४-१५ या वर्षात ३७,७४० बियाण्यांची आनुवंशिक शुद्धता, उगवणशक्ती व गुणवत्ता तपासणी करण्यात आली. यामध्ये ४८३७ नमुने हे नापास ठरविण्यात आले आहेत.
कुठलेही पीक असो अधिकाधिक उत्पन्नासाठी सुधारित जातीच्या बियाण्यांची पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. शेतकरी पेरणीसाठी बियाण्यांची खरेदी करतात. सर्वाधिक सोयाबीन व कपाशीची पेरणी विभागात होते. कपाशीचे संकरित बियाणे हे सर्वात महाग आहेत. त्यामुळे या बियाण्यांची शुद्धता पारखणे महत्त्वाचे ठरते. शेतकरी शेतातील बियाणे पुढील वर्षासाठी राखून ठेवतात. ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी साठवण केलेले बियाणे इतर शेतकऱ्यांनादेखील विकण्यात येते. मात्र या बियाण्यांचा दर्जा, प्रतवारी, गुणवत्ता प्रमाणित केलेला नसतो. अशा बियाण्यांबाबत खात्री देता येत नाही. परस्पर विश्वासावर या बियाण्यांची खरेदी-विक्री होते. अशा बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसगत होत असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांची तपासणी करुन खातरजमा करणे महत्त्वाचे आहे.
दर्जेदार, आनुवंशिक शुद्धता, गुणवत्ता असणारे बियाणे शेतकऱ्यांना बियाणे प्रमाणिकरण यंत्रणा व बीज परीक्षण प्रयोगशाळा पुणे, परभणी व नागपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या आहेत. तेथे प्रामुख्याने बियाण्यांची आनुवंशिक शुद्धता व उगवण्याची शक्ती तपासण्यात येते. कायद्यांतर्गत नियमांचे पालन करुन काढलेल्या नमुन्यांची आवश्यकतेनुसार आनुवंशिक शुद्धता, बियाण्यातील आर्द्रता, ओलावा आदी बाबींची तपासणी करण्यात येते.
या निकषावर कापूस बियाण्यांची तपासणी करण्यात आली. मागील पाच वर्षांत १ लाख ८१ हजार बियाण्यांची तपासणी केली असून यामध्ये १९ हजार ७३७ बियाणे हे अप्रमाणित करण्यात आले, हे येथे उल्लेखनीय. त्यामुळे शेतकऱ्यांनी खातरजमा करुनच बियाणे खरेदी करणे महत्त्वाचे ठरते. अन्यथा परस्पर विश्वासावर बियाण्यांची करण्यात आलेली खरेदी शेतकऱ्यांच्या अंगलट येऊ शकते.

बियाण्यांचे दोन वेळा नमुने घेतले जातात. पहिल्यांदा बियाण्यांचा लॉट अलॉटमेंट झाल्यानंतर व दुसऱ्यांदा बियाणे बाजारात आल्यावर नक्की बियाणे कुठले अप्रमाणित आहे, याविषयीची माहिती घेतो.
- दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती.

असा आहे कायदा
च्बी-बियाणे अधिनियम १९६६, बियाणे अधिनियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९६६ या कायद्याच्या अंमलबजावणीकरिता विविध बियाणे नमुन्यांची गुणवत्ता तपासणी वेगवेगळ्या स्तरावर करणे बंधनकारक आहे. यासाठी कायद्यांतर्गत तीन ठिकाणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत.

च्विदर्भात नागपूर येथे बीज परीक्षण प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ व वाशीम आदी जिल्ह्यांतून कापूस बियाण्यांची तपासणी केली जाते.

पाच वर्षांचा गोषवारा
वर्षतपासलेले नमुनेअप्रमाणित नमुने
२००९-१०३७,२९३३,२३०
२०१०-११३१,४२७४,६०५
२०११-१२३६,५२२३,६३९
२०१२-१३३८,३१९३,४१६
२०१३-१४३७,७४०४,८४७

च्दरवर्षी कापूस बियाण्यांची गुणवत्ता कमी होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसून सरासरी उत्पन्नात घट येत आहे.
च् दशकाचा आढावा घेता विभागात कापसाची लागवड कमी होऊन याची जागा सोयाबीनने घेतली आहे. कापसाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शासनाने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: 20 thousand samples of Kapashi failed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.