नुकसान भरपाईसाठी 200 शेतकऱ्यांचे उपोषण
By Admin | Published: August 25, 2016 03:56 PM2016-08-25T15:56:08+5:302016-08-25T15:58:42+5:30
पॉवरग्रिड कार्पोरेशन बाधित शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळत नसल्याच्या निषेधार्थ सुमारे २०० शेतकऱ्यांनी निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे उपोषणास प्रारंभ केला आहे.
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 25 : पॉवरग्रिड कार्पोरेशन बाधित शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळत नसल्याच्या निषेधार्थ सुमारे २०० शेतकऱ्यांनी निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे उपोषणास प्रारंभ केला आहे. उपोषणात काही महिलाही सहभागी झाल्या आहेत.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पॉवरग्रिड कार्पोरेशन आॅफ इंडिया यांचे औरंगाबाद बोईसर ४०० के.व्ही. अति उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे मनोरे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा तोडून बांधले जात आहे.
कृषी व महसूल अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याबाबत चुकीचे निकष लावले. ज्या जागी मनोरा उभा राहणार आहे. त्या बाधित जागेसाठी कुठलिही भरपाई न देता फक्त पिकाची नुकसान भरपाई मिळत आहे. द्राक्षबाग लागवडीसाठीचा खर्च ायात धरलेला नसून धारणेपासून त्याची वयोमर्यादा ३ ते १५ अशी धरलेली आहे. बाधित शेतकऱ्यांना हा दर मान्य नसून कुठलिही कपात न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी शेतकऱ्यांनी निवेदनात केली आहे.