मोबाईल टॉवरचे 200 लिटर डिझेल परस्पर विकले
By Admin | Published: October 16, 2016 07:51 PM2016-10-16T19:51:39+5:302016-10-16T19:51:39+5:30
सिल्लोड येथिल एका पेट्रोलपम्प मधून टॉवरसाठी खरेदी केलेले 200 लिटर डिझेल टॉवरला न नेता कमी किमतीत परस्पर विक्री कारणाऱ्या चोरटयास सिल्लोड
औरंगाबाद, दि. 16- सिल्लोड येथिल एका पेट्रोलपम्प मधून टॉवरसाठी खरेदी केलेले 200 लिटर डिझेल टॉवरला न नेता कमी किमतीत परस्पर विक्री कारणाऱ्या चोरटयास सिल्लोड शहर पोलिसांनी( दि. 15) रंगेहाथ पकडले.
पकडण्यात आलेल्या आरोपिचे नाव शेखशौकत शेख शब्बीर वय 35 रा. सिल्लोड असे आहे. याने इंडस मोबाईल कंपनी मार्फ़त तालुक्यात सुरु असलेल्या इंडस, एअरटेल, वोडाफोन, आयडिया मोबाईल टॉवरला देण्यासाठी सिल्लोड येथील भराडी फाट्यावर असलेल्या एम एस पेट्रोल पम्पातून 200 लिटर डिझेल शनिवारी खरेदी केले. पण ते डिझेल टॉवरला न नेता स्वताच्या फायद्यासाठी सिल्लोड शहरात कमी किमतीत काही लोकांना विकले. यांची माहिती सिल्लोड शहर पोलिसांना मिलताच पोलिस निरीक्षक के.के पाटिल,पोहेकॉ बाबा चव्हाण, गजानन चव्हाण, संदिप कोठलकर यांनी वरील आरोपीस महिंद्रा पिकअप एम.एच. 16- क्यू 7145 सहीत जेरबंद केले. इंडस कंपनीचे सुपर वाइजर योगेश उखाजी इंगले रा. गोलेगाव यांनी दिलेल्या तक्रारी वरूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.विक्री केलेल्या डिझेल अयवजी 60 लिटर डिझेल व पिकअप पोलिसांनी जप्त केले आहे.
चोरी करुन डिझेल विक्री करणारे मोठे रॅकेट सिल्लोड तालुक्यात कार्यरत आहे. हे डिझेल कुणी घेतले ... यात आणखी कोण कोण सामिल आहे. या दिशेने पोलिस तपास करत आहे.