२०० किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व खात्याला २०० पत्रे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 05:18 AM2018-03-29T05:18:42+5:302018-03-29T05:18:42+5:30

राज्यातील २०० किल्ल्यांचे संवर्धन करण्याची मागणी करत सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेने पुरातत्त्व विभागाला तब्बल २०० पत्रे धाडली आहेत.

200 papers for archaeological department to conserve 200 forts! | २०० किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व खात्याला २०० पत्रे!

२०० किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व खात्याला २०० पत्रे!

Next

मुंबई : राज्यातील २०० किल्ल्यांचे संवर्धन करण्याची मागणी करत सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेने पुरातत्त्व विभागाला तब्बल २०० पत्रे धाडली आहेत. या प्रत्येक पत्रात संबंधित ठिकाणच्या किल्ल्याचे संवर्धन करण्याची मागणी व परवानगी संस्थेने मागितल्याची माहिती प्रतिष्ठानच्या दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी दिली.
रघुवीर म्हणाले, आजवर सह्याद्री प्रतिष्ठानने ६००हून अधिक दुर्ग संवर्धन मोहिमा राबविल्या आहेत. तरी राज्यातील अनेक किल्ले असंरक्षित स्मारक आहेत. या २०० पत्रांत राज्यातील २१ जिल्ह्यांतील किल्ल्यांविषयी त्यांची डागडुजी व्हावी, ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे अशा मागण्या केल्या आहेत. सोबतच काही किल्ले हे पुरातत्त्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून त्यांच्या यादीत नोंद करून घ्यावेत, असेही आवाहन पत्रांतून केले आहे.
या पत्रांत अमरावती जिल्ह्यातील ३, अहमदनगरमधील १२, अकोलामधील ३, उस्मानाबादमधील २, औरंगाबाद येथील ८, कोल्हापुरातील १०, गोंदियातील २, चंद्रपूरमधील २, ठाण्यातील २८, नागपूरमधील ३, नाशिक येथील १५, पुण्यातील १५, बुलडाणामधील ५, भंडारातील २, मुंबईतील ७, रत्नागिरीमधील १८, रायगडमधील ३१, सांगलीतील ९, साताऱ्यातील १६, सिंधुदुर्गमधील ११ व सोलापूरमधील ४ अशा एकूण २०० किल्ल्यांचा समावेश आहे.

Web Title: 200 papers for archaeological department to conserve 200 forts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.