गंगापूर धरणातून 2000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग
By admin | Published: July 16, 2017 10:04 AM2017-07-16T10:04:56+5:302017-07-16T10:04:56+5:30
नाशिकमधील गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्याने सकाळी 6 वाजता धरणात 40 हजार 200 दलघफूपर्यंत पाणीसाठा वाढला
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 16 - पहाटेपासून नाशिकमधील गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्याने सकाळी 6 वाजता धरणात 40 हजार 200 दलघफूपर्यंत पाणीसाठा वाढला. धरण 75 टक्के भरल्याने सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास विसर्ग सुरू करण्यात आला. 2000 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून गोदापत्राची पाण्याची पातळी वाढली आहे. धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढू शकतो, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, नाशिक अग्निशामक व आपत्ती व्यवस्थापन विभगाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठावर असलेल्या घरांना सावधान करण्यात आले आहे. रामकुंड परिसरातील विक्रेत्याना ही हलविण्यात आले आहे.