२०१७ चा प्रारंभ एक सेकंद उशिरा होणार

By admin | Published: December 26, 2016 11:41 PM2016-12-26T23:41:32+5:302016-12-26T23:58:37+5:30

येत्या रविवारी होणारा नवीन वर्ष २०१७ चा प्रारंभ एक सेकंद उशिरा होणार आहे. २०१२ मध्ये रविवारने जरी वर्षारंभ झाला असला तरी ते लीप वर्ष होते.

2017 starts with a second delay | २०१७ चा प्रारंभ एक सेकंद उशिरा होणार

२०१७ चा प्रारंभ एक सेकंद उशिरा होणार

Next
>   - दा. कृ. सोमण
येत्या रविवारी नव वर्षाला प्रारंभ होत आहे. या नवीन वर्षाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नववर्ष २०१७ चा प्रारंभ एक सेकंद उशिरा होणार आहे. २०१२ मध्ये रविवारने जरी वर्षारंभ झाला असला तरी ते लीप वर्ष होते. त्यामुळे मार्चपासूनचे कॅलेंडर वेगळे होते. सन २००६ मध्ये मात्र २०१७ प्रमाणे कॅलेंडर होते. ३१ डिसेंबर २०१६ या दिवशी लीप सेकंद गृहीत धरला जाणार आहे. त्यामुळे त्या दिवशी रात्री बारा वाजल्यानंतर लगेचच नवीन वर्ष २०१७ सुरू होणार नाही. मध्ये एक सेकंद गेल्यानंतर नवीन वर्ष २०१७ सुरू होणार आहे.
पृथ्वीचा वेग मंदावत आहे. घड्याळे अधिक अचूक आहेत. त्यामधील फरक दूर करण्यासाठी ही गोष्ट करण्यात येत असते. यापूर्वी ३० जून २०१५ रोजी लीप सेकंद गृहीत धरण्यात आला होता. १९७२ पासून आत्तापर्यंत एकूण सव्वीस वेळा असा लीप सेकंद गृहीत धरण्यात आला आहे. 
२०१७ या नव वर्षातील काही ठळक वैशिष्टे
लीप वर्ष नाही :  २०१७ हे वर्ष लीपवर्ष नसल्याने म्हणजे फेब्रुवारीस २८ दिवस असल्याने या वर्षात एकूण ३६५ दिवस असणार आहेत. 
 रविवारने सुरुवात :  २०१७ हे वर्ष रविवारने सुरू होत आहे. यापूर्वी २०१२ हे वर्ष रविवारने सुरू झाले होते, आता या नंतर सन २०२३ हे वर्षही रविवारने सुरू होणार आहे. म्हणजे सन २०१२, २०१७ आणि २०२३ ची कॅलेंडर्स सारखीच आहेत. 
अमवास्येदिवशी गुढीपाडवा : सन २०१७ मध्ये गुढीपाडवा हा सण फाल्गुन अमावास्येच्याच दिवशी २८ मार्च रोजी येत आहे. यापूर्वी सन २००८ मध्ये असा आला होता. आता यानंतर सन २०२६ मध्येही गुढीपाडवा हा सण फाल्गुन अमावास्येच्याच दिवशी येणार आहे.
सूर्य आणि चंद्र ग्रहणे : २०१७ मध्ये दोन चंद्रग्रहणे आणि दोन सूर्यग्रहणे होणार असून शुक्रवार १० फेब्रुवारीचे छायाकल्प चंद्रग्रहण आणि सोमवार ७ आॅगस्टचे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. मात्र २६ फेब्रुवारीचे कंकणाकृती सूर्यग्रहण आणि २१  ऑगस्टचे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाहीत.
सोने खरेदीचे मुहूर्त :  सोने खरेदीसाठी २०१७ मध्ये एकूण पाच गुरूपुष्य योग येणार आहेत. १) १२ जानेवारी, २) ९ फेब्रुवारी, ३) ९ मार्च, ४) ९ नोव्हेंबर आणि ५) ७ डिसेंबर रोजी गुरूपुष्य योग असणार आहेत.
तीन अंगारक योग :  २०१७ मध्ये गणेश भक्तांसाठी तीन अंगारकी चतुर्थी येत आहेत. १४ फेब्रुवारी , १३ जून आणि ७ नोव्हेंबर रोजी संकष्ट चतुर्थी मंगळवारी आल्याने एकूण तीन अंगारकी चतुर्थी योग आले आहेत. 
विवाह मुहुर्त : विवाहेच्छुकांसाठी २०१७ मध्ये भरपूर विवाह मुहूर्त असणार आहेत. जानेवारीत ७, फेब्रुवारीत १२ , मार्चमध्ये ९, एप्रिलमध्ये ४, मे मध्ये १४, जूनमध्ये १५ , जुलैमध्ये ३ , नोव्हेंबरमध्ये ५ , डिसेंबर मध्ये ५ विवाह मुहूर्त आहेत. मात्र आॅगस्ट, सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये विवाह मुहूर्त नाहीत.
शिवराज्याभिषेक :  तारखेप्रमाणे दरवर्षी रायगड किल्ल्यावर ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. शिवभक्त हा दिवस तिथीप्रमाणेही साजरा करतात. सन २०१७ मध्ये ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी ७ जूनला येत आहे. त्यामुळे रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा ६ व ७ जून असा सलग दोन दिवस असणार आहे.
गुरूलोप :  सन २०१७ मध्ये गुरू ग्रह सूर्यतेजामध्ये लुप्त झाल्यामुळे १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर आपणांस दिसू शकणार नाही. तसेच शुक्र ग्रह सूर्यतेजामध्ये लुप्त झाल्यामुळे २२ मार्च ते २६ मार्च आणि १६ डिसेंबर ते १ फेब्रुवारी २०१८ पर्यंत आपणास दिसू शकणार नाही.
सर्व सण लवकर :   सन २०१७ मध्ये आपले सर्व सण मागीलवर्षापेक्षा सुमारे ११ दिवस लवकर येत आहेत. सन २०१८ मध्ये ज्येष्ठ अधिक महिना येणार असल्याने ते उशिरा येतील.
सुट्यांची चंगळ : चाकरमान्यांसाठी खुशखबर म्हणजे सन २०१७ मध्ये सुट्ट्यांची चंगळ असणार आहे. छ. शिवाजी महाराज जयंती (१९ फेब्रुवारी ) , श्री महावीर जयंती (९एप्रिल) , मोहरम ( १ आॅक्टोबर) या तीनच सुट्ट्या रविवारी येत आहेत. उरलेल्या २१ सुट्ट्या या इतर वारी येत आहेत. दुसरा व चौथा शनिवार ज्याना सुट्टी असते त्यांना फेब्रुवारी, मार्च, जून, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबर महिन्यात सलग तीन दिवस सुट्टी मिळणार आहे.
                                
 

Web Title: 2017 starts with a second delay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.